Home Breaking News विज्ञान, खगोल शास्त्र आणि गणित विषयाच्या व्याख्यानाचे आयोजन

विज्ञान, खगोल शास्त्र आणि गणित विषयाच्या व्याख्यानाचे आयोजन

89

विज्ञान, खगोल शास्त्र आणि गणित विषयाच्या व्याख्यानाचे आयोजन

Oplus_16908288

चिमूर प्रतिनिधी
गुणवंत चटपकार

पी एम श्री शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, सर्जनशीलता आणि नाविण्यपूर्णता दिसावी तसेच विज्ञान विषयाला प्रोत्साहन देण्यासाठी पी एम श्री अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळा चिमूर येथे शाळास्तरावर राष्ट्रीय पातळीवरील तज्ञ व्यक्तींचे व्याख्यान आणि मार्गदर्शन आयोजित करण्यात आले.
मराठी विज्ञान परिषद, अमरावती यांचे तर्फे मनोरंजक विज्ञानाचे प्रयोग तसेच सहल अंतराळाची या विषयांवर उत्कृष्ट व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष मा. प्रा. प्रवीण गुल्हाने यांनी विद्यार्थिनींना अतिशय मनोरंजकपद्धतीने, सोप्या पद्धतीने विज्ञानाचे प्रयोग करून दाखविले. विज्ञान विषयाबद्दल विद्यार्थिनींमध्ये कुतूहल निर्माण व्हावे असे आवाहन केले. तसेच परिषदेचे हौशी खगोल अभ्यासक मा. विजय गिरुळकर यांनी सहल अंतराळाची या विषयातून सूर्यमालेतील ग्रह, तारे यांची अतिशय रंजक माहिती सांगत असताना प्रश्नांची उत्तरे देणाऱ्या विद्यार्थिनींना पुस्तके भेट दिली. तसेच सचिव मा. प्रा. सुशिलदत्त बागडे यांनी गणित आणि विज्ञान विषयाबद्दल आवड निर्माण करण्यासाठी प्रेरित केले.
शाळेच्या मुख्याध्यापिका सुनिता खोब्रागडे यांच्या प्रयत्नातून सदर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. प्रसंगी शाळेचे शिक्षक श्री सतीश कुकडे, श्री विनय खापर्डे, श्रीमती अनुराधा महाजन, श्रीमती ज्योत्सना नेऊलकर, श्री पंकज काळे, श्री राजरत्न गजभिये आणि वैभव चट्टे उपस्थित होते. विद्यार्थिनींनी व्याख्यानामद्ये उत्साहाने सहभाग घेतला.