दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न
सुवर्ण भारत:खेमचंद नेरकर
तालुका अध्यक्ष, वरोरा
वरोरा :आनंद माध्यमिक विद्यालय ,आनंदवन येथे 3 फरवरी 2025 ला शाळेच्या सभागृहात दहाव्या वर्गाचा निरोप समारंभ कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महारोगी सेवा समितीचे विश्वस्त तथा शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सुधाकर कडू हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त मुख्याध्यापक मदन ठेंगणे,आ. नि.महा. प्राचार्या राधा सवाने, जी.प.शाळेचे मुख्याध्यापक पत्रुजी उमाटे ,आ. मा. वी मुख्याध्यापिका विद्या गोखरे या मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका विद्या गोखरे यांनी आपल्या प्रास्ताविकातून शाळेची रूपरेषा व प्रगती विशद केली.
समाजभान असेल तरच आपले कर्तुत्व,वकृत्व,मोठेपणा सिद्ध करता येतो.
सुधाकर कडू
कार्यक्रमामध्ये अध्यक्षस्थानावरून आपले विचार व्यक्त करताना सुधाकर कडू म्हणाले दहाव्या वर्गाचे विद्यार्थ्यांना गहिवरून आले.शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये असलेले आपसी प्रेम,जिव्हाळा या सर्व गोष्टींना आपण आता पारखे होणार की काय असे विद्यार्थ्यांना वाटू लागले.परंतु शिक्षकांचे विद्यार्थ्याशी नाते अतूट असते.ज्यांची स्पर्धा स्वतःशी आहे त्याला कोण जिंकणार,दहावी झाल्यानंतर आपण कोणता विषय घ्यायचा याबाबत विद्यार्थी अडचणीत येतात.परंतु आपल्याला जो विषय आवडतो तो तुम्ही निवडू शकता.प्राचार्या राधा सवाने मार्गदर्शनासाठी सदैव तत्पर आहे.चांगले काय आहे हे समाजाकडून घेतले पाहिजे.विचारवंत असणे आवशक असून पुस्तक वाचली पाहिजे.श्रद्धेय बाबा आमटे ना समाजभान होते.जिथून बाबा आमटे गेले तिथूनच अनेक माणसे गेली परंतु घरी गेल्यावर बाबा आमटे मध्ये समाजभान जागृत झाले.त्यामुळे आनंदवन चे नावाने महाभारत घडले.आनंदवनात वेदनारहित लोकांच्या वेदना , संवेधना बाबा – ताईने समजून घेतल्या आणि आज कृष्ठरोगी आज आनंदवनात आनंदाचे जीवन जगत आहे.विद्यार्थ्यांनी समाजभान ठेऊन मनन,चिंतन करून पुस्तक वाचले पाहिजे आणि आपली यशस्वी शैक्षणिक वाटचाल पुढे चालू ठेवावी .असे आपले विचार व्यक्त करून दहाव्या वर्गाच्या विद्यार्थ्यांना यशवंत होण्याच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमात प्रमुख अतिथी सेवानिवृत्त मुख्याध्यापक मदन ठेंगणे,योगगुरू ,सेवानिवृत्त शिक्षक दीपक शिव,प्राचार्या राधा सवाने,मुख्याध्यापक उमाटे यांनी अमूल्य मार्गदर्शन केले.तसेच शिक्षकांचे वतीने सहा.शिक्षक आशिष येटे सरांनी पुढील शिक्षणाच्या वाटा याविषयी अनेक उदाहरणे देऊन बहुमूल्य असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला जी.प.शाळेचे आठव्या वर्गाचे विद्यार्थी पाहुणे म्हणून कार्यक्रमाला उपस्थित होते.
कार्यक्रमाची आखणी व रूपरेषा मुख्याध्यापिका विद्या गोखरे ,सहा.शिक्षक प्रदीप कोहपरे ,हर्षल चौधरी यांनी तयार केली असून कार्यक्रमस्थळाची सजावट तसेच मुलींच्या गायनाची तयारी व आदी महत्वाची कार्य सहा.शिक्षक आशिष येटे,,स्मिता ठेंगणे,संचीता निबुधे या शिक्षक वृंदानी सहकार्य केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सर्वरी नक्षिणे तर आभारप्रदर्शन सोनल गुळगुंडे या विद्यार्थिनीने केले.