Home Breaking News Chandrapur dist@ news •संवाद, प्रबोधन, बंधुभाव, व सौहार्द करीता चंद्रपूरात ...

Chandrapur dist@ news •संवाद, प्रबोधन, बंधुभाव, व सौहार्द करीता चंद्रपूरात संविधान शाखेची बैठक संपन्न!

51

Chandrapur dist@ news
•संवाद, प्रबोधन, बंधुभाव, व सौहार्द करीता चंद्रपूरात संविधान शाखेची बैठक संपन्न!

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

चंद्रपूर:काल रविवार दि. 17 डिसेंबर 2023 ला सेल्फ रिस्पेक्ट मोव्हमेन्टची 100 वी संविधान शाखेची एक महत्वपूर्ण बैठक पार पडली. स्थानिक डॉ .आंबेडकर पुतळ्या मागील मैदानात या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
आरंभी जनगनमन या राष्ट्रगीताचे सामूहिक गायन करण्यात आले. समाजातील विविध घटकांमध्ये संवाद साधल्या जावा, एकमेकांमध्ये विचाराची देवाण घेवाण व्हावी, विविध प्रश्नावर प्रबोधन व्हावे व समाजात बंधुभाव वाढून आपापसात सौहार्द निर्माण व्हावे या उद्देशाने दि. 15 नोंव्हेबर 2021 पासून चंद्रपूर शहरात शीतलामाता मंदिराच्या मैदानावरून सुरु करण्यात आलेल्या संविधान शाखा मध्ये सातत्य राखल्या मुळे काल 17 डिसें.2023 ला 100 वी संविधान शाखा साजरी करण्याची संधी आपल्याला लाभली असल्याचे सेल्फ रिस्पेक्ट मूव्हमेंटचे मुख्य संघटक बळीराज धोटे यांनी सांगितले. कोणत्याही चांगल्या आणि लोकोपयोगी उपक्रमामध्ये सातत्य असले तर त्या उपक्रमाच्या चांगले पणाचा विचार समाजातील सर्व घटकांमध्ये निश्चित पोहोचतो.

संविधान शाखेला सातत्य राखल्याने शहराच्या विविध भागात दर रविवारी संविधान शाखा घेण्यात आल्या. यात त्या त्या परिसरातील नागरिकांना आमंत्रित करण्यात आले. संविधान शाखेत मानवी जीवनाला भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांवर व्यापक चर्चा करण्यात येतात. सरकारची धोरणे समाजाला मारक की तारक यावर विविध अंगाने चर्चा करण्यात येते व उपस्थितातांचे समाधान करण्यात येते. चर्चेचे स्वरूप विवादा ऐवजी संवाद ठेवण्यावर असते. परिणामी सहभागी होणाऱ्यांचे प्रबोधन होऊन समाजाचे व राष्ट्राचे खरे हितचिंतक कोण व शत्रू कोण याची ओळख सहभागी होणाऱ्यांना होते.

जेष्ठ संघटक पी. एम. जाधव यांनी बिना वाती आणि बिना तेलाचा पाण्याचा दिवा पेटवून दाखविला व बुवाबाजीच्या नावाने चलाख लोक साध्याभोळ्या लोकांची फसवणूक कशी करतात याचा प्रयोग करून दाखविला.

100 व्या संविधान शाखेत जेष्ठ संघटक भास्करराव मुन, हिराचंद बोरकुटे, किशोर पोतनवार, येशू पोतनवार महादेव ढुमणे आदिंनी आपले विचार व्यक्त केले . संविधान शाखेचा उपक्रमविविध समाज घटकांना अपासात जोडून सवांद, सौहार्द, बंधुभाव वाढावा व प्रबोधन व्हावे अशी अपेक्षा या वेळी सर्वांनी व्यक्त केली.
चंद्रपूर शहराच्या विविध भागातील व विविध समाज घटकातील नागरिक, युवक व महिलांची 100 व्या संविधान शाखेला मोठ्या संख्येंने उपस्थिती होती.असे बळीराज धोटे यांनी सांगितले.
शेवटी भारतीय संविधानाच्या उद्धेशपत्रिकेचे सामूहिक वाचन व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज रचित राष्ट्रवंदनेचे सामूहिक गायन करण्यात आले. सर्वांनी आपला परिचय दिल्या नंतर संविधान शाखेचा समारोप करण्यात आला.