Home Breaking News Chandrapur dist@ news •चंद्रपूरात साहित्य संसदेची महत्वपूर्ण बैठक संपन्न

Chandrapur dist@ news •चंद्रपूरात साहित्य संसदेची महत्वपूर्ण बैठक संपन्न

41

Chandrapur dist@ news
•चंद्रपूरात साहित्य संसदेची महत्वपूर्ण बैठक संपन्न

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

चंद्रपूरातील मृणालगिरी सभागृहात काल साहित्य संसदेची महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीत दि. २४ फेब्रुवारी २०२४ रोजी होऊ घातलेल्या पहिल्या राज्यस्तरीय पुरोगामी साहित्य संमेलना विषयी साधक बाधक चर्चा करण्यात आली. आयोजित बैठकीला पुरोगामी साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष प्रब्रम्हानंद मडावी ,रंगशाम मोडक ,रामटेके ऍड.योगिता रायपूरे चंद्रपूर, शोभाताई वेले नरेंद्र सोनारकर ,मनोज मोडक, विजय भसारकर , ज्योती चन्ने , सिमा भसारकर,मृणाल कांबळे संगीता घोडेस्वार,सविता भोयर पाटील ,नरेंद्र पिंगे प्रामुख्याने उपस्थित होते.

सदरहु बैठकीत कार्यक्रमांच्या वेळेचे तथा आर्थिक नियोजन बाबत चर्चा करण्यात आली.संमेलनाचे पत्रक तथा वर्गणी बुक या वेळी वाटप करण्यात आले. संमेलनाचा खर्च बघता वैयक्तिक निधी उभारण्यावर भर दिला गेला.शोभाताई वेले यांनी १० हजार रुपयांचा धनादेश कार्यक्रमासाठी दिला.तर स्वागत अध्यक्ष मड़ावी ,ऍड.योगिता रायपुरे रंगशाम मोड़क, नरेंद्र सोनारकर इत्यादींनी वैयक्तिक निधी देण्यबाबतची घोषणा केली.जिल्हा निमंत्रक रंगशाम मोडक यांनी उपस्थितांचे आभार मानले.