Home Breaking News Ballarpur city@ news •भाजपा तर्फे बल्लारपुर शहरात कँन्सर व अन्य आजारांवर ...

Ballarpur city@ news •भाजपा तर्फे बल्लारपुर शहरात कँन्सर व अन्य आजारांवर मोफत उपचार शिबिराचे आयोजन

146

Ballarpur city@ news
•भाजपा तर्फे बल्लारपुर शहरात कँन्सर व अन्य आजारांवर मोफत उपचार शिबिराचे आयोजन

✍️शंकर महाकाली
सुवर्ण भारत:उपसंपादक

बल्लारपुर : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त नामदार सुधीर मुनगंटीवार व दत्ता मेघे उच्च शिक्षण व महाविद्यालय संचलित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी (मेघे) यांच्या संयुक्त विद्यमाने ७ जानेवारी २०२४ रोजी मोफत बल्लारपूरच्या गांधी विद्यालय, जुना बस स्टॉप बल्लारपूर येथे रोग निदान व उपचार शिबिराचा भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या शिबिरात मेडीसीन,नेत्र रोग, सर्जरी, स्त्री रोग, बाल रोग, नाक,कान व घसा, अस्थिरोग, त्वचा रोग,श्वशनरोग, हृदयरोग,मानसिक रोग,दंत व मुख रोग,युरो व न्युरो तज्ञ डाक्टरांना बोलाविण्यात आले आहे. व शंभरहून अधिक प्रकारच्या आजारांवर मोफत उपचार केले जाणार आहेत.अशी माहिती झालेल्या पत्रकार परिषदेत भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व कार्यक्रमाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल व माजी नगराध्यक्ष हरीश शर्मा यांनी दिली आहे.

या आयोजित मोफत उपचार शिबिराचा बल्लारपूरवासी यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे कॅन्सरसारख्या आजारांवर मोफत उपचार केले जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या शिबिरात लाखो रुपये खर्च करणाऱ्या रुग्णावर भारतीय जनता पक्षा तर्फे मेघे सावंगी, नागपूर किंवा मुंबई येथील सर्वोत्तम रुग्णालयात मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

या नियोजित शिबिरात आतापर्यंत ८००- १००० हून अधिक लोकांनी विनामूल्य नोंदणी केली असल्याचा अंदाज आहे.

७ जानेवारी २०२४ पर्यंत २००० हून अधिक लोकांची नोंदणी होण्याची शक्यता आहे.बल्लारपूरच्या जनतेची सेवा करणाऱ्या या आयोजित कार्यक्रमात एकूण १५० हून अधिक ज्येष्ठ डॉक्टर, त्यांचे सहाय्यक आणि कर्मचारी सहभागी होणार

या पूर्वनियोजित शिबिरात येताना जनतेला आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी आपले आधारकार्ड, रेशनकार्ड किंवा कोणतेही ओळखपत्र तसेच त्यांच्या आजारा संबंधीची कोणतीही कागदपत्रे सोबत आणावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. सोबत आणले.

शिबिराच्या अधिक माहितीसाठी कार्यक्रमाचे समन्वयक निलेश खरबडे यांच्याशी संपर्क साधता येईल.या आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते चंदनसिंग चंदेल व बल्लारपूर पूर्व नगराध्यक्ष अध्यक्ष हरीश शर्मा यांच्या शुभहस्ते होणार आहे.

यावेळी भाजपचे नेते निलेश खरबड़े,भाजपचे शहराध्यक्ष काशीनाथ सिंह,समीर केने, अधिवक्ता रणंजय सिंग,मनीष पांडे,घनश्याम बुरडकर,श्रीकांत आंबेकर,उपस्थित होते