mul taluka @news
• मूलचे तत्कालीन एसडीओ महादेव खेडकर यांचेवर गुन्हे दाखल करा या मागणीसह अन्य मागण्यांसाठी -एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालया समोर ठिय्या आंदोलन!
• रास्त मागण्यांसाठी होते अ.भा.आदिवासी विकास परिषद युवा शाखा चंद्रपूर जिल्हा शाखेचे आंदोलन: ठिय्या आंदोलनात अनेकांचा सहभाग 

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत: सहसंपादक
मूल:खरे आदिवासींचे प्रमाणपत्र गैर आदिवासींना देणारे मूल येथील तत्कालीन उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांचेवर गुन्हे दाखल करण्यात यावे ,आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना अजूनही वजाबाकी व बेरीजचे ज्ञान नसल्यामुळे शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी अनुभवी व कार्यक्षम शिक्षकांची नेमणूक करावी ,इंडिजीनफ ट्रायब्रल केअर फाॅऊंडेशन व इत्तर संस्थेला हाॅस्पिटल,डी.एम.एल.टी.काॅलेज , नर्सिंग कॉलेज, निर्मिती करीता व बांधकाम करण्यासाठी पाच कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात यावा ,६जूलै २०१७च्या सुप्रिम कोर्टाच्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करुन आदिवासी युवा युवतींना नोकरीत सामावून घेण्यात यावे , आदिवासी बांधवांना दोनशे युनिट वीज बिल मोफत देण्यात यावे , आदिवासी विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षाचे क्लाॅसेस सुरू करण्यात यावे अश्या एकंदरीत २५मागण्यांसाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली युवा शाखा चंद्रपूर जिल्हा तर्फे स्थानिक पदाधिकारी व सदस्यगणांनी आज शुक्रवार दि.५जानेवारीला दुपारी ११वाजता येथील एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालया समोर ठिय्या आंदोलन केले.
यावेळी अखिल भारतीय आदिवासी वि.जिल्हा शाखेचे अध्यक्ष अतुल कोडापे,बिरसा ब्रिगेडचे अध्यक्ष जितेश कुळमेथे, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद सावली शाखेचे अध्यक्ष प्रविण गेडाम, युवराज उईके,शुभम मटामी, ओंकार कोवे,स्वप्निल धाबाडे, मनोहर मेश्राम, सुभाष कोवे, अशोक कन्नाके, रघुराम शेडमाके,प्रफुल शिडाम, शिवा मेश्राम, मोनिका मडावी,शुभलक्ष्मी गेडाम,यांचेसह या संघटनेचे अनेक पदाधिकारी, सदस्यगण व चंद्रपूर जिल्ह्यातील युवक व युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.दरम्यान आज या ठिय्या आंदोलनाला शहरातील अनेक राजकीय व सामाजिक संघटनेच्या नेत्यांनी भेटी देऊन या आंदोलनाला पाठिंबा दिला. पडोली येथील सामाजिक कार्यकर्ते पुंडलिक गोठे यांनी दुपारी आंदोलनस्थळी भेट देवून आपल्या पार्टीचे समर्थन दिले.मागण्यांची पूर्तता तातडीने न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जितेश कुळमेथे यांनी दिला आहे.
