–सिंधुताई सकपाळ—
🌼कु.मंगल शामराव मिसाळ सहज सुचलं सदस्य ठाणे
✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक
चिंधी ते सिंधुताई होता
फार अवघड प्रवास
ज्ञानाच्या जोरावर
लढा दिला खास //१//
चिंधीची झाली पहा
कशी ती सिंधुताई
देऊन आधार अनाथांना
झाली त्यांची माई //२//
सिंधुताई सपकाळ
अनाथांची ती माऊली
शिरावर अनाथांच्या
त्यांच्या प्रेमाची सावली //३//
स्वकीयांनी नाकारले तरी
समाजा मध्ये बहरली
धाडस, चिकाटी, जिद्द
स्वकर्तृत्वाने चमकली//४//
दुःखाचा डोंगर तिने
स्वकर्तृत्वाने पेलवला
कोमेजलेल्या कळ्यांचा
बगीच्या त्यांनी फुलवला //५//
सिंधुताईचे कार्य
आहे खूप महान
अनाथांची माय बनून
वाढवली महाराष्ट्राची शान //६//