Home Breaking News Chandrapur city@ news • गुणवंत शिक्षक व शिक्षणासाठी पूरक वातावरण निर्माण करणा-या...

Chandrapur city@ news • गुणवंत शिक्षक व शिक्षणासाठी पूरक वातावरण निर्माण करणा-या सेवकांचा गौरव करता आला याचा आनंद – आ. किशोर जोरगेवार

89

Chandrapur city@ news
• गुणवंत शिक्षक व शिक्षणासाठी पूरक वातावरण निर्माण करणा-या सेवकांचा गौरव करता आला याचा आनंद – आ. किशोर जोरगेवार

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

चंद्रपुर: साधारणतः शिक्षक संघटनांच्या कार्यक्रमात शिक्षकांचा गौरव केला जातो असा आजवरचा आमचा अनुभव होता. मात्र शिक्षक सहकारी संघटनेच्या वतीने शिक्षणासाठी विद्यार्थांना शाळांमध्ये शिक्षणपूरक वातावरण निर्माण करणा-या या व्यवस्थेतील महत्त्वपूर्ण पण दुर्लक्षित घटक असणाऱ्या अंगणवाडी सेविका, शालेय पोषण आहार शिजवणारे स्वयंपाकी व मदतनीस यांचा गौरव करण्यात आला आहे. त्यामुळे या सेवकांचा गौरव करत असतांना अधिक आनंद होत असल्याचे प्रतिपादन चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

शिक्षण सहकारी संघटनेच्या वतीने जिल्हा गुणवंत शिक्षक, राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार व शिक्षक – शिक्षण विशेषांक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला मंचावर नियोजन विभागाचे अवर सचिव डॉ. नंदकुमार राऊत, उपशिक्षणाधिकारी अनिता ठाकरे, गोंडपिपरीचे गटशिक्षणाधिकारी समाधान भसारकर, राज्याध्यक्ष संतोष पिट्टलवाड, रविंद्र अंबुले,शुभांगी चौधरी, दीपक परचंडे, गजानन देवकत्ते आदिं मान्यवर मंचावर उपस्थित होते.

यावेळी पूढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले कि, एखाद्या संघटनेचे अधिवेशन म्हणजे मागण्यांचा भडीमार असतो. परंतु शिक्षक सहकार संघटना मात्र याला अपवाद आहे. कारण शिक्षक सहकार संघटनेच्या या संमेलनामध्ये मागण्या नाहीत तर कर्तुत्वाचा गौरव करण्यात आलेला आहे. व्यवस्थेतील महत्त्वपूर्ण पण दुर्लक्षित घटक असणाऱ्या अंगणवाडी सेविका तसेच शालेय पोषण आहार शिजवणारे स्वयंपाकी व मदतनीस यांचा गौरव आपण केला आहे. आपली संकल्पना आणि उपक्रम कौतुकास्पद आहे. आपण शिक्षण व्यवस्थेतील वंचित घटकाला पुरस्कार देऊन समाजाच्या समोर आणले आहे. पुरस्कार प्राप्त चेहऱ्यावरचा आनंद हाच त्यांच्या कामाची खरी पावती आहे. शाळा उघडण्यापासून ते शाळा बंद होईपर्यंत साफसफाई, स्वयंपाक, मुलांकडे लक्ष देणे स्वच्छता या हे सर्व काम हे घटक करता. परंतु त्यांच्या या कामाचा गौरव होत नव्हता. शिक्षक सहकार संघटना ही सुरुवातीपासूनच अतिशय वेगवेगळ्या पद्धतीने काम करून आपला वेगळेपण सिद्ध करत असते. विद्यार्थी हित आणि शिक्षक हित यासाठी सदैव तत्पर असणारी ही संघटना असल्याचे यावेळी बोलतांना आमदार जोरगेवार म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी नंदकुमार राऊत यांनी आपल्या छोटेखानी मार्गदर्शनामध्ये शिक्षकांचे कौतुक केलं तसेच हलक्या फुलक्या वातावरणामध्ये आपल्या कविता ऐकवत शिक्षकांना योग्य अशी दिशा दाखवली तर उपशिक्षणाधिकारी ठाकरे यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयावर अतिशय सुंदर असे विचार मांडले नागपूर विभाग प्रमुख रवि अंबुले यांनी आपल्या मनोगतात शिक्षक सहकार संघटनेची वाटचाल विषेद केली. तर महिला राज्याध्यक्ष शुभांगी चौधरी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रमात रवि अंबुले यांच्या ‘शब्दशिल्प‘ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच शिक्षक शिक्षण संवाद या वार्षिक विशेषांकाचेही प्रकाशन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष अविनाश जुमडे यांनी केले तर आभार सुरेंद्र शेंडे यांनी मानले. यावेळी राज्यभरातुन शिक्षक सहकार संघटनेचे पदाधिका-यांसह अनेक शिक्षक उपस्थित होते. सुत्रसंचलन कु.एकता बंडावार यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी,दीपक परचंडे,गजाजन देवकत्ते,मनोज बनकर, शशिकांत चाफेकर,सुरेंद्र गौतम ,राजांनंद दुधे, राजकिरण मोरे,निलेश गिरडकर,आशिष भिमटे,संतोष कुळमेथे,संतोष रामटेके,संदेश गोवर्धन,अमित दुर्गे,विनोद खापर्डे,नितीन पुसाटे,भालचंद्र कासवटे,गुलाब बिसेन,सुलोचना माहूरकर,रश्मी गुरनुले,सोनाली सोरते,महिपाल मांढरे,संदीप भुसारे,उत्तम चौधरी,व संघटनेच्या जिल्ह्यातील पदाधिकारी‌ व सदस्य यांनी परिश्रम घेतले.