Home Breaking News Mul city@ news • अखेर दत्तात्रय समर्थ यांच्या निवेदनाची प्रशासनाने घेतली दखल!...

Mul city@ news • अखेर दत्तात्रय समर्थ यांच्या निवेदनाची प्रशासनाने घेतली दखल! • मूल एसडीओंनी केलेल्या कारवाईचे केले जनतेंनी स्वागत!

319

Mul city@ news
• अखेर दत्तात्रय समर्थ यांच्या निवेदनाची प्रशासनाने घेतली दखल!
• मूल एसडीओंनी केलेल्या कारवाईचे केले जनतेंनी स्वागत!

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

मूल: जिल्ह्यातील अवैध गौण खनिजांवर अंकूश व दंडात्मक कारवाई करण्यासाठी चंद्रपूर जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी काही दिवसांपूर्वीच तहसीलदारांना आदेश दिले होते. त्या अनुषंगाने सर्व तालूकास्तरांवर तहसिलदारांनी महसूल पथक तयार केले होते.या शिवाय जिल्हा खनिकर्म विभागाचे देखिल एक पथक कार्यरत आहेत.मूल तालुक्यातील अवैध गौण खनिजांवर अंकूश लावावा अश्या आशयाचे एक लेखी निवेदन काही दिवसांपूर्वी चंद्रपूर जिल्हा काँग्रेस औद्योगिक सेलचे शहराध्यक्ष तथा सामान्य कामगार सेवा चंद्रपूर जिल्हा कार्याध्यक्ष दत्तात्रय समर्थ व अन्य काही पदाधिकाऱ्यांनी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी यांना सादर केले होते हे सर्वश्रूतच आहे.दोन दिवसांपूर्वीच मूलचे एसडीओ विशालकुमार मेश्राम यांनी गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून अवैध रेतीचे एक वाहन पकडले व त्या अवैध रेती तस्करांवर दंडात्मक कारवाई केली. हे विशेष! एव्हढेच नाही तर त्यांनी अवैध रेती तस्करावर केलेल्या कारवाईचे जनतेंनी स्वागत केले.अश्या नित्य कारवाया झाल्यास निश्चितच अवैध गौण खनिजांवर अंकूश बसेल यात मुळीच शंका नाही.

गोंडपिपरी तालुक्यातून मूल मार्गे रात्रीच्या वेळेस वाहनांव्दारे अवैध रेतीची वाहतूक होत असल्याची मूल गोंडपिपरी तालुक्यातील जनतेत चर्चा सुरू आहे.जुणगांव देवाडा तद्वतच बोडाळा ह्या परिसरात अधिक लक्ष पुरविल्यास अवैध रेतीचे वाहने मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.याकडे खरोखरच गोंडपिपरी महसूल पथकाचे लक्ष वेधेल काय ?हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे.