Home Breaking News Chandrapur dist@ news • विकास गायकवाड यांनी दिलं अजगरला जीवदान

Chandrapur dist@ news • विकास गायकवाड यांनी दिलं अजगरला जीवदान

50

Chandrapur dist@ news
• विकास गायकवाड यांनी दिलं अजगरला जीवदान

✍️ किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

भद्रावती: तालुक्यातील चंदनखेडा येथील शेतकरी पंढरी विठ्ठल हनवते यांच्या शेतात आज गुरुवार दि. १८ जानेवारीला अजगर प्रजातीचा एक भला मोठा साप आढळून आला . दरम्यान शेतकरी हनवते यांनी चंदनखेडा येथील सर्प मित्र विकास गायकवाड यांना ही माहिती दिली.माहीती मिळतात तात्काळ सर्प मित्र गायकवाड यांनी शेतकरी पंढरी हनवते यांच्या शेतात जाऊन तो भला मोठा अजगर पकडला. १० फूट लांबी व ११ किलो वजन असलेल्या या प्रजातीचा अजगरला सर्पमित्र विकास गायकवाड यांनी भद्रावती येथील वनविभाग मध्ये जावून त्याची रितसर नोंदणी केली व परवानगी घेऊन त्या अजगरला आयुध निर्माणी येथील जंगल परिसरात सोडून दिले .अर्थातच एक प्रकारे त्या भल्या मोठ्या सापास आज जिवदान दिले .