Chandrapur city@ news
• चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयातील अव्यवस्थेवर व्यक्त केली चंद्रपूरचे आ. किशोर जोरगेवारांनी नाराजी
•रुग्णांना ताटकळत ठेवण्याचा प्रकार आला उघडकीस!
•शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात पार पडली आढावा बैठक ; अधिका-यांना दिले वेळीच निर्देश
✍️ किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक
चंद्रपुर:शासकीय वैद्यकीय महाविद्यालया मधील अनेक तक्रारी प्राप्त होत असतात. सोनोग्राफी करणे आवश्यक असलेल्या रुग्णांना सोनोग्राफीसाठी आठ ते पंधरा दिवस ताटकाळत ठेवणे योग्य नाही. हा गंभीर प्रकार असुन असे प्रकार खपवून घेतले जाणार नाही. रुग्णांची सोनोग्राफी वेळीच करण्यासाठी तात्काळ उपाययोजना करा असे निर्देश चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार किशोर जोरगेवार यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता मिलिंद कांबळे यांना काल दिलेले आहे.
शुक्रवारी स्थानिक शासकीय वैद्यकीय रुग्णालय येथे आमदार जोरगेवार यांनी एका आढावा बैठकीचे आयोजन केले होते. या प्रसंगी येथील विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली असुन यावर तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश यावेळी आमदार जोरगेवार यांनी संबधित अधिका-यांना दिले आहे. सदरहु बैठकीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता मिलींद कांबळे, विभाग प्रमुख डाॅ. प्रशांत उईके, अतिरिक्त निवासी वैद्यकीय अधिकारी डाॅ. जिवने, समाजसेवा अधिक्षक उमेश आडे, यंग चांदा ब्रिगेडच्या बंगाली समाज महिला प्रमुख सविता दंडारे, आशा देशमुख, यंग चांदा ब्रिगेडच्या आरोग्य सेविका, वैशाली मेश्राम ,वंदना हजारे, एमआयएमचे अमान अहमद आदींची उपस्थिती होती.
◾◽शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेण्यासाठी चंद्रपूर जिल्हासह लगतच्या जिल्ह्यातील रुग्ण येत असतात. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेची मोठी जबाबदारी या रुग्णालयावर आहे. आपण अतिशय जबाबदारीच्या ठिकाणी आहात त्यामुळे आपण उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न केला पाहिजे अशा सुचना यावेळी आमदार जोरगेवार यांनी अधिका-यांना केल्या आहे. येणा-या रुग्णांशी रुग्णालयातील कर्मचा-यांची वागणूक योग्य नसल्याचे प्रकार वारंवार समोर येत आहे. आपल्यावरील कामाच्या ताणाची जाण आम्हाला आहे. मात्र आपण रुग्णांशी सौजण्यपुर्ण वागणूक ठेवली पाहिजे, रुग्णालयात स्वच्छतेची विशेष काळजी आपण घेतली पाहीजे असे ते यावेळी म्हणाले. नियमीत स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था येथे असली पाहिजे, वार्डातील लाईट व पंखे बंद असल्यास ते तात्काळ दुरुस्त करावे, रुग्णांचा येथे परिपुर्ण उपचार करावा, वैद्यकीय उपकरणे नादुरुस्त अवस्थेत असतील तर त्याची देखभाल दुरुस्ती तत्काळ करावी, उपकरणे बंद आहेत म्हणून रुग्णांना जाणीवपूर्वक बाहेरुन तपासणी करण्यास बाध्य करण्याचे प्रकार खपविले जाणार नाही असेही आमदार जोरगेवार यांनी बैठकीत अधिका-यांना बजावून सांगितले
डाॅक्टर वेळेत कर्तव्यावर हजर होत नाही. रात्रपाळीत डाॅक्टर उपस्थित नसते अशा तक्रारी प्राप्त झाल्या आहे. अशा प्रकाराला आळा घालण्यात यावा, रुग्णालयाच्या बाहेरुन औषधी विकत आणायला लावण्याचे प्रकार बंद करा, रुग्णालयात अनेक उपकरणांची कमी आहे. या संदर्भात तत्काळ वैद्यकीय शिक्षण विभागाकडे पत्रव्यवहार करण्यात यावा, रुग्णांना रक्त त्वरित उपलब्ध होईल यासाठी उपाययोजना करण्यात यावी, रक्तदात्यांच्या नावाची यादी येथे लावण्यात यावी अशा अनेक सुचना सदरहू बैठकीत आमदार जोरगेवार यांनी केल्या आहे. उपरोक्त बैठकीला संबधित डाॅक्टरासह यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिका-यांची उपस्थिती होती.