Home Breaking News Chandrapur dist@ news •चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार म्हणतात- शंभर श्रद्धास्थानी ...

Chandrapur dist@ news •चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार म्हणतात- शंभर श्रद्धास्थानी स्वच्छता अभियान राबविणार •पुढेही हा उपक्रम असाच सुरूच राहणार !

143

Chandrapur dist@ news
•चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार म्हणतात- शंभर श्रद्धास्थानी स्वच्छता अभियान राबविणार
•पुढेही हा उपक्रम असाच सुरूच राहणार !

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

चंद्रपुर: चंद्रपूर मतदार संघात आपण मंदिर स्वच्छता अभियानाला सुरुवात केली असुन चंद्रपूरची आराध्य दैवत माता महाकाली मंदिरापासून आपण याचा शुभारंभ केला आहे. चंद्रपूर शहरातील काल प्राचीन काळाराम मंदिर येथे स्वच्छता अभियान राबविले असुन येत्या काही दिवसात चंद्रपूरातील विविध 100 श्रध्दा स्थानांची स्वच्छता करणार असल्याचे आमदार जोरगेवार यांनी म्हटले आहे.
शुक्रवारी आमदार जोरगेवार यांनी चंद्रपूरातील प्राचीन असलेल्या काळाराम मंदिरात स्वच्छता अभियान राबविले. यावेळी श्री माता महाकाली महोत्सव समिती, चंद्रपूर महानगरपालिका आणि यंग चांदा ब्रिगेड या सामाजिक संघटनेने उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. यावेळी मनपा आयुक्त विपिन पालिवाल, माजी नगर सेवक बलराम डोडाणी, माता महाकाली महोत्सव समितीचे सचिव अजय जयस्वाल, विश्वस्त मलिंद गम्पावार, यंग चांदा ब्रिगेडचे युवा नेते अमोल शेंडे, आदिवासी विभागाचे जिल्हा अध्यक्ष जितेश कुळमेथे, ग्रामीण तालुकाध्यक्ष राकेश पिंपळकर, सविता दंढारे, सायली येरणे, भाग्यश्री हांडे, आशा देशमूख, अल्का मेश्राम, शंकर दंतुलवार, राम मंढे, अधिवक्ता परमहंस यादव, राहुल मोहुर्ले, हेरमन जोसेफ, देवा कुंटा, तापोष डे, बबलू मेश्राम आदिंची उपस्थिती होती.

येत्या 22 जानेवारीला अयोध्येत आयोजित रामललाच्या प्राणप्रतिष्ठापनेची तयारी जोरात सुरु आहे. महाराष्ट्रातही 22 जानेवारीला राज्यभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान राज्यभरातील मंदिरांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात यावे असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होते. त्याला प्रतिसाद देत आमदार जोरगेवार यांनीही मंदिरामध्ये स्वच्छता मोहिम सुरु केली असुन याची सुरुवात चंद्रपूरची आराध्य दैवत असलेल्या माता महाकालीच्या मंदिरातून करण्यात आली होती.
काल चंद्रपूरातील प्रसिध्द असलेल्या पुरातण काळाराम मंदिर परिसरात चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार जोरगेवार यांच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानाला नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी मंदिर परिसर संपूर्ण स्वच्छ करण्यात आला. पुढेही हा उपक्रम असाच सुरुच राहणार असल्याचे आमदार जोरगेवार यांनी म्हटले आहे.