Chandrapur city@ news
• वारंवार पत्रव्यवहार व पाठपुरावा करूनही त्यांच्या मागणीची पूर्तता नाही
• अखेर ” ते” वनकामगार चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालया जवळ अन्नत्याग उपोषणाला बसले !
चंद्रपूर :किरण घाटे
सुवर्ण भारत(पोर्टल न्यूज)
गेल्या ४०ते ४२वर्षांपासून सामाजिक वनीकरण परिक्षेत्र पुसद येथे रोजंदारीवर कार्यरत असणाऱ्या वनकामगारांना आता पावेतो सेवेत कायम न केल्यामुळे त्यांच्यात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.या संदर्भात त्यांनी वारंवार वरिष्ठांकडे पत्रव्यवहार केला पण त्यांच्या प्रयत्नांना यश प्राप्त झाले नाही.शेवटी महाराष्ट्र राज्य रोजंदारी वनकामगार कृती समिती शाखा पुसदचे अध्यक्ष रमाशंकर राममनोहर शुक्ला यांच्यासह उपाध्यक्ष बाबू मधव शेळके, सचिव प्रकाश मैनाजी खंदारे, वनकामगार वामन महादू इंगोले, सिताराम गोपाळ राठोड,मोहन रतन राठोड व उत्तम राठोड हे आज मंगळवार दि.23 जानेवारीला चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी 11वाजता अन्नत्याग उपोषणाला बसले आहेत.दरम्यान त्यांनी चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या निवासस्थानासमोर उपोषणाला बसण्याची परवानगी उपोषण कर्त्यांनी मागितली होती.परंतु पोलिस विभागाने त्यांना ती परवानगी नाकारल्याचे महाराष्ट्र राज्य रोजंदारी वनकामगार कृती समितीचे अध्यक्ष रमाशंकर शुक्ला यांनी आज या प्रतिनिधीस चंद्रपूर मुक्कामी बोलताना सांगितले.अर्धे आयुष्य या विभागात (नोकरीत घालविणा-या ) वनकामगारांनी दि.13-12-2023ला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किडनी विकण्याची किंवा आत्मदहन करण्याची परवानगी आम्हाला द्यावी अशी विनंती त्यांनी राज्याच्या वनमंत्र्यांकडे केली होती.रोजंदारीवर काम करणाऱ्या या कामगारांना कायम स्वरुपी करण्याच्या मागणीची शासन खरोखरच दखल घेईल काय ?