Home Breaking News Chandrapur city@ news • राज्यस्तरीय महाआंदोलन समितीचे विविध मागण्यांसाठी चंद्रपूरात राज्यव्यापी आंदोलन!

Chandrapur city@ news • राज्यस्तरीय महाआंदोलन समितीचे विविध मागण्यांसाठी चंद्रपूरात राज्यव्यापी आंदोलन!

99

Chandrapur city@ news
• राज्यस्तरीय महाआंदोलन समितीचे विविध मागण्यांसाठी चंद्रपूरात राज्यव्यापी आंदोलन!

चंद्रपूर: किरण घाटे
सुवर्ण भारत(पोर्टल न्यूज़)

चंद्रपूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज दि.२३जानेवारी पासून राज्य स्तरीय महाआंदोलन समितीचे राज्यव्यापी महाआंदोलन प्रारंभ सुरू झाले आहे.सन १९७६पासून कोळी महादेव,डोंगर कोळी,कोळी मल्हार, कोळी ढोर, टोकरे कोळी या अनुसुचित जमातींना अनुसुचित जाती व जमाती आदेश (सुधारीत ) कायदा,१९७६या कायद्यानुसार संविधानिक अधिकार, हक्क व लाभ मिळत नसल्यामुळे त्यांनी बेमुदत अन्नत्याग आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.दरम्यान आज शेंकडों बंधू भगिनी या आंदोलनात सहभागी झाल्याचे मंडपस्थळी दिसून आले.जिवती तालुक्यातील संगनापूर येथील ज्ञानोबा येल्लेवाड, शिवाजी भोईनवाड,अनंत येलेबोईनवाड,प्रभाकर संबटवार आदिंनी या वेळी आपल्या भाषणातून उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले.