Home Breaking News Gadchiroli dist@ news’ • जय श्रीराम’च्या जयघोषाने आलापल्ली नगरी दुमदुमली •...

Gadchiroli dist@ news’ • जय श्रीराम’च्या जयघोषाने आलापल्ली नगरी दुमदुमली • ‘कलश यात्रे’ने वेधले सर्वांचे लक्ष

30

Gadchiroli dist@ news’
• जय श्रीराम’च्या जयघोषाने आलापल्ली नगरी दुमदुमली

• ‘कलश यात्रे’ने वेधले सर्वांचे लक्ष

✍️शंकर महाकाली
सुवर्ण भारत:संपादक

आलापल्ली: आयोध्या येथे होणाऱ्या रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना निमित्य आलापल्ली येथील श्रीराम मंदिर येथे पाच दिवसीय विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.त्यात २१ जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास काढण्यात आलेली ‘कलश यात्रा’ सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.यावेळी महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग होत जय श्रीराम च्या जयघोषात संपूर्ण परिसर दणाणून सोडला.

आलापल्ली येथे श्रीराम मंदिर कमिटी, श्रीराम जन्मोत्सव कमिटी द्वारा १७ जानेवारी ते २२ जानेवारी पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.यात श्रीराम नामजप यज्ञ, हनुमान चालीसा पठण, राम रक्षा पठण, आरती, गरबा नृत्य,कलश यात्रा आदी कार्यक्रम घेऊन २२ जानेवारी रोजी श्रीराम अभिषेक पूजा त्यानंतर गतपाच शतकापासून रामभक्त ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण म्हणजे बहुप्रतीक्षित राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळा. या सोहळ्याचे याठिकाणी थेट प्रक्षेपण दाखविण्यात येणार आहे.तर दिवसा आणि रात्री या ठिकाणी विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहे.

मात्र,आता पर्यंत घेण्यात आलेल्या कार्यक्रमात २१ तारखेला सायंकाळच्या सुमारास महिलांनी विविध मंदिरातून श्रीराम मंदिर पर्यंत आणि मुख्य चौकात काढलेलं कलश यात्रा हे सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आलापल्ली आणि नागेपल्लीतील प्रत्येक प्रभागातून महिला एकत्र आले होते.

∆ माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांची उपस्थिती∆

आलापल्ली येथील श्रीराम मंदिर परिसरातून मुख्य चौकात काढण्यात आलेल्या कलश यात्रेत माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी उपस्थित राहून कलश यात्रेत सहभागी झाले.यावेळी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघायला मिळाला.