Home Breaking News Allapali taluka@ news • बाल क्रीडा संमेलनाच्या निधीत वाढ करण्यासाठी प्रयत्न करणार...

Allapali taluka@ news • बाल क्रीडा संमेलनाच्या निधीत वाढ करण्यासाठी प्रयत्न करणार •मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांची ग्वाही •तालुका स्तरीय क्रीडा व सांस्कृतिक संमेलनाचे उदघाटन

32

Allapali taluka@ news
• बाल क्रीडा संमेलनाच्या निधीत वाढ करण्यासाठी प्रयत्न करणार

•मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांची ग्वाही

•तालुका स्तरीय क्रीडा व सांस्कृतिक संमेलनाचे उदघाटन

✍️शंकर महाकाली
सुवर्ण भारत:संपादक

आलापल्ली:- बाल गोपालांमधील क्रीडा कौशल्य व कलागुणांना वाव मिळावं यासाठी केंद्र,तालुका व जिल्हा स्तरावर दरवर्षी क्रीडा व सांस्कृतिक संमेलनाचे आयोजन केले जाते.मात्र,मागील अनेक वर्षांपासून या निधीत वाढ न झाल्याने अत्यल्प निधीतुन आयोजन करावा लागत आहे.मोठी निधी उपलब्ध झाल्याशिवाय अश्या कार्यक्रमांचे आयोजन करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे केंद्र,तालुका आणि जिल्हा स्तरावरील क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आवश्यक असलेली निधी मिळावं यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ग्वाही राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी दिली.

अहेरी तालुक्यातील तालुका स्तरीय क्रीडा व सांस्कृतिक संमेलनाचे उदघाटन सोमवार (२२ जानेवारी) रोजी आलापल्ली येथील तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानात यांच्याहस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते.यावेळी सह उदघाटक म्हणून माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम,प्रमुख पाहुणे म्हणून माजी प स सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम, विशेष अतिथी म्हणून आलापल्लीचे सरपंच शंकर मेश्राम,उपसरपंच विनोद अक्कनपल्लीवार,राजारामचे सरपंच निर्मला आत्राम,कार्यकर्ते श्रीकांत मद्दीवार,सामाजिक कार्यकर्ते अरुण मुक्कावार,राकॉचे अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येर्रावार,सदस्य पुष्पा अलोने,कार्यकर्ते श्रीकांत मद्दीवार, सामाजिक कार्यकर्ते अरुण मुक्कावार,राकॉचे अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येर्रावार,सदस्य पुष्पा अलोने,अध्यक्ष म्हणून गटशिक्षणाधिकारी धनंजय कांबळे, विशेष अतिथी म्हणून अहेरीचे पोलीस निरीक्षक मनोज काळबांधे,प्राचार्य गजानन लोनबले आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना आदीवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये अनेक सुप्तगुण दळलेले असून ते बाहेर काढण्यासाठी क्रीडा क्षेत्रात मोठी जबाबदारी स्वीकारण्याची गरज आहे.आपल्या भागात चांगले सुसज्ज स्टेडियमची गरज आहे.त्या अनुषंगाने अहेरी येथे २५ कोटी रुपयांच्या निधीतून स्टेडियम उभारणार असून त्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविल्याचे त्यांनी सांगितले.एवढेच नव्हेतर तर गोंडवाना विद्यापीठ साठी देखील एक कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.विद्यार्थी, तरुण आणि तरुणींनी खेळामध्ये सातत्य ठेवल्यास भविष्यात क्रीडा क्षेत्रात मोठं यश मिळणार असल्याची आशा त्यांनी व्यक्त करत बालगोपलांना शुभेच्छा दिले.

अध्यक्षीय भाषणात गटशिक्षणाधिकारी धनंजय कांबळे यांनी गेल्या चार वर्षांपासून शालेय क्रीडा स्पर्धा झाले नाहीत.यावर्षी क्रीडा व सांस्कृतिक संमेलन होत असून विध्यार्थ्यांना क्रीडा कौशल्य व कलागुण दाखविण्याची संधी मिळत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. दरम्यान शालेय विद्यार्थ्यांनी लेझीम द्वारे मान्यवरांचे जल्लोषात स्वागत केले आणि पथसंचलन तसेच झांकीने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.शपथविधी व उदघाटन पार पडल्यावर दर्शनीय सामना घेण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फुलोरा सुलबक रामदास कोंडागुर्ले व शिक्षिका सुमन चव्हाण यांनी केले.

◆१२ केंद्रातील ५०० विध्यार्थी दाखवणार क्रीडा कौशल्य◆

अहेरी तालुक्यात अहेरी,आलापल्ली, वेलगुर,देवलमरी,पेरमिली,राजाराम,महागाव,बोरी,दामरंचा,जिमलगट्टा, उमानूर, देचली असे १२ केंद्र असून येथील तब्बल ५०० विध्यार्थी खेळाडू आपले क्रीडा कौशल्य व कलागुण दाखविणार आहेत.त्यासाठी सर्व शिक्षकांनी जय्यत तयारी केली.