Varora taluka@ news
• जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र ,चंद्रपूर मॉडल कॅरिअर सेंटर व श्री साई आय.टी.आय. भद्रावती यांच्या संयुक्त विद्यमाने
• भद्रावतीत २९ जानेवारीला पंडित दीनदयाल उपाध्याय भव्य रोजगार मेळावा.
• प्लेसमेंट ड्राईव्ह अनेक नऊ कंपन्यांची उपस्थिती राहणार.
✍️खेमचंद नेरकर
सुवर्ण भारत:तालुका प्रतिनिधी, वरोरा
वरोरा:शैक्षणिक व बेरोजगार विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याकरीता जिल्हा कौशल्य विकास व उद्योगजग मार्गदर्शन केंद्र चंद्रपूर, श्री साई आय.टी.आय .भद्रावती यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगार मेळाव्याचे आयोजन २९ जानेवारी २०२४ ला भद्रावती येथील गुंडावर लॉन ,भाजी मार्केट जवळ सकाळी ११ ते ४ या वेळेत रोजगार मेळाव्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा भद्रावती मध्ये पाहिल्यानदाकच होत आहे. सदर मेळाव्यात सात कंपन्यांचा सहभाग राहणार असून यात संन्सूर इंडिया प्रा. लि.चंद्रपूर, जय महाराष्ट्र प्लेसमेंट सर्विसेस प्रा. लि. चंद्रपूर, भारत पे प्रा .लि. चंद्रपूर एस.बी.आय लाइफ इन्शुरन्स कंपनी, चंद्रपूर, स्टार युनियन लाइफ इन्शुरन्स कंपनी, टॅलेंट सेतू प्रा.लि.पुणे आदी व इतर कंपन्यांचा सहभाग राहणार असून, विविध क्षेत्रातील जागे करिता रोजगार निर्मिती करीत तज्ञ अधिकारी मार्गदर्शक मंडळी द्वारे मार्फत मार्गदर्शन केले जाणार आहे. विविध जागा भरण्यासंदर्भात सदर रोजगार मेळाव्यामध्ये वयोगट १८ ते ४५ पात्रता योग्य उमेदवार राहतील. सदर रोजगार मेळाव्यात उपस्थित राहून लाभ घेण्याकरता www.rojgar mahaswayam.gov.in आणि www.ncs.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी व अधिक माहिती जाणून घेण्याकरता प्रत्यक्ष रोजगार मेळाव्यात सहभागी होताना. अधिक माहिती जाणून घेण्याकरता दूरध्वनी क्र.०७१७२-२५२२९५ संपर्क करावा . तसेच मेळाव्यात सहभागी होताना आपले आधार कार्ड, शैक्षणिक कागदपत्राचे झेरॉक्स कमीत कमी तीन प्रतीमध्ये व स्वतःचा बायोडाटा इत्यादी सह सोमवार
दिनांक २९ जानेवारी २०२४ ला सकाळी ११ ते ४ वाजता गुंडावर लॉन , भाजी मार्केट जवळ ,विंजासन रोड भद्रावती येथे आयोजित भव्य रोजगार मेळाव्यात प्रामुख्याने उपस्थित राहण्याचे आव्हान श्री भै.गो. येरमे , सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र चंद्रपूर व श्री. किशोर पत्तीवार, श्री साई आय.टी.आय. भद्रावती यांनी केले आहे.