Home Breaking News Chimur taluka@ news •चिमूर तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात वन चौकीदार ठार

Chimur taluka@ news •चिमूर तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात वन चौकीदार ठार

62

Chimur taluka@ news
•चिमूर तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात वन चौकीदार ठार

✍️खेमचंद नेरकर
सुवर्ण भारत:तालुका प्रतिनिधी, वरोरा

चिमूर: चिमूर तालुक्यातील निमडेला गावातील रामभाऊ हनवते वय वर्ष 52 हा वन चौकीदार म्हणून रोजंदारी वर काम करीत होता.कर्तव्यवरून परत येत असतांना मार्गात कवठाचे होते होते.कवठ घरी न्यावे ह्या हेतूने झाडाजवळ गेला असता देवबाभळीत दबा धरून बसलेल्या वाघाने रामभाऊ वर हल्ला चढवून ठार केले .आणि अर्धा किलोमीटर फरफटत नेले.ओरडण्याचा आवाज नागरिकांच्या कानावर आदळताच नागरिक आवाजाचे दिशेने धावले आणि घटना उघडकीस आली.
सदर घटना 25 जानेवारी 2024 ला सकाळचे सुमारास घडली.
खडसंगी वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या कक्ष क्र.59 लगत बफर झोन रामदेगी निमडेला पर्यटक गेटवर सकाळ च्या सुमारास रोजंदारी चौकीदार रामभाऊ हनवते हा आपले कर्तव्य बजावून घराकडे परतीच्या प्रवासाला सायकलने निघाला असता मार्गातच कवठाचे झाड होते कवठ घेऊन घराकडे जावे ह्या हेतूने कवठाचे झाडात गेला.परंतु कुटीचे समोर देवबाभळीत दबा धरून बसलेल्या वाघाने त्याच्यावर हल्ला चढवून ठार केले आणि अर्धा की.मी.वर फरफटत नेले.तीन महिन्यात दुसरी घटना घडली आहे.रामदेगी बफर झोन क्षेत्रात सध्या भानुसखिंडी तिचे बच्चे मटकासूर ,बबली असे वाघांचे पर्यटकांना दर्शन होत आहे.चौकीदार कामगार याला ठार करणारा वाघ भानुसखिंडी चा बच्चा असल्याचे सूत्रांची माहिती आहे.हे बच्चे मोठ्या प्रमाणात अग्रेसिव्ह असून नेहमीच रामदेगी मध्ये येत असलेल्या भविकांवर आक्रमक पवित्रा घेत असल्याचे सांगितले जाते.
सदर घटनेची माहिती पसरताच मोठ्या प्रमाणात नागरिकांनी पाहण्यासाठी गर्दी केली. वनविभाग टीम ,शेगाव पोलीस टीम घटनास्थळी दाखल झाले .पुढील चौकशी बफर झोनचे वनपरिक्षेत्र अधिकारी किरण धानकुटे हे करीत आहे