Chandrapur dist@ news
• चंद्रपूरात निघाला प्रजासत्ताक दिनी आयटकचा विराटआक्रोश मोर्चा !
• हजारों महिला कर्मचा-यांचा मोर्चात सहभाग!
चंद्रपूर :किरण घाटे
सुवर्ण भारत(पोर्टल न्यूज़)
चंद्रपूरातील स्थानिक आझाद बागेतून आज प्रजासत्ताक दिनी दुपारी १२वाजता आयटकच्या वतीने रास्त व न्याय मागण्यांसाठी महिला कर्मचाऱ्यांचा एक विशाल आक्रोश मोर्चा निघाला.
सदरहु मोर्चात चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील हजारों आशा, गटप्रवर्तक व शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.
आयोजित ह्या विराट मोर्चाचे नेतृत्व आयटकचे जिल्हासचिव काॅ.विनोद झोडगे,राज्य उपाध्यक्ष काॅ . देवराव चवळे, जिल्हा कार्याध्यक्ष काॅ.रविन्द्र उमाटे, काॅ.प्रकाश रेड्डी, राजू गैनवार काॅ.निकीता निर , फरजाना शेख, पुंडलिक गोठे, संगिता गटलेवार, उषा उराडे, वनिता कुंठावार आदिंनी केले. चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची एका शिष्टमंडळाने संध्याकाळी सहा वाजता चंद्रपूरच्या विश्रामगृहावर भेट घेत त्यांना मागण्यांचे एक लेखी निवेदन सादर केले.
शिष्टमंडळाच्या भेटी नंतर आयटकचे दिग्गज नेते काॅ.विनोद झोडगे यांनी आमच्या मागण्या रास्त असल्याचे या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
आजच्या या विराट आक्रोश मोर्चाने चंद्रपूरकरांसह शासन व प्रशासनाचे लक्ष वेधले !हे मात्र तेव्हढेच खरे!.गेल्या काही दिवसांपासून आशा वर्कर, गटप्रवर्तक व शालेय पोषण आहार कर्मचारी जिल्हास्तरावर धरणे आंदोलन करीत आहे. परंतु शासनाने त्यांच्या रास्त मागण्यांची अद्याप दखल घेतली नसल्याचे एकंदरीत दिसून येते. राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज आयटकने चंद्रपूर शहरात विशाल मोर्चा काढला.कायदा शांतता व सुव्यवस्था ठेवण्याच्या दृष्टीकोनातून मोर्चा दरम्यान चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालया बाहेर पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.