Chandrapur dist@ news
• आदिवासी कोळी जमातीचे चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्यव्यापी धरणे आंदोलन सुरूच !
चंद्रपूर :किरण घाटे
सुवर्ण भारत(पोर्टल न्यूज़)
आदिवासी कोळी जमातीचे राज्यव्यापी धरणे आंदोलन दि. 23 जानेवारी पासून सुरू झाले असून आज या धरणे आंदोलनाचा चवथा दिवस आहे .स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेकडोंच्या संख्येने आदिवासी कोळी जमात बांधव बेमुदत धरणे आंदोलनात सहभागी झाले असून आंदोलनात स्त्रिया ,लहान मुले व विद्यार्थी देखील सहभागी झाल्याचे आंदोलनस्थळी भेट दिली असता दिसून आले. केंद्र सरकारच्या 1976 च्या कायद्याची जशीच्या तशीच अमलबजावणी करावी. व स्थानिक गृह चौकशी, रक्त नातेवाईकांचे जात प्रमाणपत्र या आधारावर उपविभागीय अधिकारी राजुरा यांनी जात प्रमाणपत्र द्यावे.वडिलांचे जात प्रमाणपत्र असून सुद्धा मुलाला जात प्रमाणपत्र दिल्या जात नाही.उप विभागीय अधिकारी यांनी आदिवासी कोळी जमात बांधवांस बेकायदेशीर त्रास देणे तात्काळ थांबवावे. आदिवासी कोळी जमातीचे जमात प्रमाणपत्र मिळण्यासंबंधी जिवती येथील तहसील कार्यालय व सेतू केंद्रांना प्रकरण दाखल करून घेण्यासाठी लेखी पत्र द्यावे.ह्या प्रमुख मागण्यांसाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरू असून जो पर्यंत मागण्या मान्य करून लेखी पत्र देत नाही त्या शिवाय आंदोलन मागे घेतल्या जाणार नाही असे आदिवासी कोळी समाजाचे आंदोलक ज्ञानोबा येलकेवाड, बाबू पुल्लेवाड, विश्वनाथ येंचेवाड,बालाजी पुल्लेवाड शिवाजी भोईनवाड,लक्ष्मण भोईनवाड,येलेबोईनवाड,निलेश घंटेवाड ,किरण चुंचूलवाड,आकाश देवरवाड, गणपत देवरवाड,काशिनाथ येंचेवाड, गोपीनाथ येंचेवाड,लक्ष्मण येंचेवाड,संभाजी पुट्टेवाड,बालाजी घंटेवाड ,बळीराम संबटवाड बालाजी येटेवाड,मारुती बोईनवाड ,अमृतवर्षा याटेवाड, गयाबाई गिरेवाड, भागुबाई मादसवाड,जनाबाई रेनेवाड,विश्वनाथ याटेवाड,ज्ञानेश्वर गुडमेवाड,प्रतिक येलेबोईनवाड, रमेश गुडमेवाड दिनेश चिंचूलवाड आदिंनी या वेळी सांगितलें.