Home Breaking News Bhadrawati taluka@news • सांस्कृतिक कार्यक्रमातून व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते:डॉ ज्ञानेश...

Bhadrawati taluka@news • सांस्कृतिक कार्यक्रमातून व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते:डॉ ज्ञानेश हटवार

112

Bhadrawati taluka@news

• सांस्कृतिक कार्यक्रमातून व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते:डॉ ज्ञानेश हटवार

✍️मनोज मोडक
सुवर्ण भारत : ता.प्र. भद्रावती

भद्रावती- भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचालित यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चिचोर्डी भद्रावती येथे नुकतेच वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न झाले. त्यात विविध क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक स्पर्धा, नृत्य, एकांकिका अशा अनेक कार्यक्रमाची रेलचेल झाली.

यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ ज्ञानेश हटवार , उद्घाटक डॉ श्वेता शिंदे, प्रमुख अतिथी सौ मयूरी शिंदे व्यासपीठावर उपस्थित होते.
डॉ श्वेता शिंदे यांच्या हस्ते वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन झाले. मार्गदर्शन करतांना वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. अध्यक्षीय मार्गदर्शन करताना “सांस्कृतिक कार्यक्रमातून सुप्त कलागुणांना चालना मिळते व व्यक्तिमत्व विकसित होतो” असे मार्गदर्शन प्रा. डॉ ज्ञानेश हटवार यांनी केले . प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना सौ मयूरी शिंदे यांनी शिक्षणासोबतच सांस्कृतिक कार्यक्रमाचे महत्त्व विशद केले.
या कार्यक्रमात विविध विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. आपल्या अंगी असलेल्या कलागुणांना चालना देवून त्यांनी आपले उत्तम प्रदर्शन करून रसिक , प्रेक्षकांना खिळवून ठेवले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महादेव ताजने सर पर्यवेक्षक यांनी केले. सूत्रसंचालन प्रा प्रणिता बोकडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा वर्षा दोडके यांनी केले. कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येत उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सांस्कृतिक समितीतील प्राध्यापक , शिक्षक यांनी सहकार्य केले.