Chandrapur dist @news
• सहज सुचलं महिला व्हाॅट्सअप गृपच्या सुपरिचित कवयित्री वर्षा अनिल शेंडे ठरल्या स्त्री नारीशक्ती पुरस्काराच्या मानकरी!
•अनेक साहित्यिक मंडळींने केले कवयित्री शेंडे यांचे अभिनंदन
चंद्रपूर :किरण घाटे
अर्जुनी मोरगांवच्या एस .एस.जे .महाविद्यालय व मातोश्री जिजाऊ परिवर्तन मराठी साहित्य परिषदेच्या वतीने थाटात पार पडलेल्या एका भव्य दिव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात विदर्भाच्या चंद्रपूर जिल्ह्यातील शंकरपूर येथील मूळ रहिवाशी तथा महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या सुपरिचित कवयित्री वर्षा अनिल शेंडे यांना त्यांना त्यांच्या साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय व भरीव कामगिरीसाठी “स्त्री नारीशक्ती “पुरस्काराने गौरविण्यात आले.
आयोजित कार्यक्रमाला साहित्य क्षेत्रातील अनेक नामवंत मान्यवर मंडळी उपस्थित होती.
याच कार्यक्रमाच्या निमित्ताने कवि संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.त्यात अनेक कवींनी आपला सहभाग नोंदविला.
कवयित्री वर्षा शेंडे यांचे ग्रामीण भागात वास्तव्य असून गेल्या काही वर्षांपासून सामाजिक क्षेत्रासोबतच त्यांचे साहित्य क्षेत्रात फार मोठे योगदान आहे.शेकडों काव्यरचना त्यांनी शब्दांकित केल्या असून या पूर्वी देखील त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.विदर्भासह राज्यात पार पडलेल्या अनेक कविसंमेलनात त्यांनी भाग घेतला आहे.
महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं काव्यकुंजच्या त्या एक जेष्ठ सदस्य आहे.दरम्यान कवयित्री शेंडे यांना स्त्री नारीशक्ती पुरस्कार मिळाल्याबद्दल साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
