Chandrapur city@ news
• भारतमाता पूजनाचा कार्यक्रम संपन्न !
•कार्यक्रमाला चंद्रपूरचे आ.किशोर जोरगेवार व प्रा.डॉ.सतीश चाफले यांची उपस्थिती !
चंद्रपूर :किरण घाटे
शहीद भगतसिंग चौक मित्र मंडळाच्या वतीने नुकताच भारत माता पूजनाचा कार्यक्रम चंद्रपूर शहरातील पठाणपूरा या मुख्य मार्गावरील शहीद भगतसिंग चौकात पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष विद्यमान आमदार किशोर जोरगेवार यांनी विभुषित केले होते तर प्रमुख वक्ते म्हणून नागपूर उपराजधानीचे प्रा.डॉ. सतीश चाफले हे प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी भारत माता पूजन करण्यात आले . दिप्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली. श्रेयश घरोटे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले त्यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातून भगतसिंग चौक मित्र मंडळाच्या कार्याचा लेखाजोखा मांडला.
या प्रसंगी आ. किशोर जोरगेवार यांनी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. सतीश चाफले यांना अम्मा का टिफिन देऊन स्वागत केले.
आ. जोरगेवार यांनी आपल्या भाषणात मंडळाच्या उल्लेखनिय कार्याचे अभिनंदन करत तोंडभरून कौतुक केले. भविष्यात असेच उत्तमोत्तम कार्यक्रम घ्यावे असा मोलाचा सल्ला त्यांनी मंडळाच्या सदस्यांना दिला .या वेळी
डॉ. चाफले हे आपल्या मार्गदर्शनपर भाषणात म्हणाले कि, छत्रपती शिवाजी महाराजाचे नैतिक अधिष्ठान हे प्रभू श्रीराम होते. छत्रपती शिवाजी महाराज यांची स्वराज्य स्थापन करण्यात महत्वाची भूमिका होती. भारतीय सांस्कृतिक खच्चीकरण तत्कालीन कालखंडात करण्यात आले. प्रभू श्रीरामाला आराध्य मानून छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले कार्य सुरु ठेवले. प्रभू श्रीराम मंदिराचा इतिहास हा ५०० वर्ष जुणा आहे .१९९० ,१९९२ या वर्षात अयोध्येत कारसेवा झाली. सौगंध राम कि खाते है, मंदिर भव्य बनायेगे या उद्घोषणाने आंदोलनाची सुरुवात झाली. व आता आपल्या प्रभू रामचंद्राला आपल्या राष्ट्रमंदिरात विराजमान करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद काटपाटाळ यांनी केले. तर वैयक्तिक गीत श्रीरंग खोंड यांनी सादर केले. वंदेमातरम् तेजस्विनी घरोटे हिने सुरेख गायिले, उपस्थितीतांचे आभार अभिषेक ठाकरे यांनी मानले.कार्यक्रमाला नागरिकांची उपस्थिती लक्षणीय अशीच होती.आयोजित
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साठी सुयश खटी, मयूर घरोटे, प्रसाद घरोटे, अमोल पिंपळशेंडे, रोहित आत्राम, तुषार आत्राम, नकुल आचार्य, कार्तिक मुसळे, अथर्व आचार्य कार्तिक भाकरे, आदिंनी अथक परिश्रम घेतले.