Home Breaking News Chandrapur city@ news • प्रख्यात कवयित्री वर्षा शेंडेंना मिळाला नारीरत्न पुरस्कार •...

Chandrapur city@ news • प्रख्यात कवयित्री वर्षा शेंडेंना मिळाला नारीरत्न पुरस्कार • अनेकांनी केले त्यांचे अभिनंदन

150

Chandrapur city@ news
• प्रख्यात कवयित्री वर्षा शेंडेंना मिळाला नारीरत्न पुरस्कार
• अनेकांनी केले त्यांचे अभिनंदन

चंद्रपूर :किरण घाटे

अर्जुनी मोरगांवच्या एस .एस.जे .महाविद्यालय व मातोश्री जिजाऊ परिवर्तन मराठी साहित्य परिषदेच्या वतीने थाटात पार पडलेल्या एका दिमाखदार पुरस्कार वितरण सोहळ्यात विदर्भाच्या चंद्रपूर जिल्ह्यातील शंकरपूर येथील मूळ रहिवाशी तथा महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या सुपरिचित कवयित्री वर्षा अनिल शेंडे यांना त्यांना त्यांच्या साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय व भरीव कामगिरीसाठी “नारीरत्न “पुरस्काराने गौरविण्यात आले.

आयोजित कार्यक्रमाला साहित्य क्षेत्रातील अनेक नामवंत मान्यवर मंडळी उपस्थित होती.

कवयित्री वर्षा शेंडे यांचे सामाजिक व साहित्य क्षेत्रात फार मोलाचे योगदान आहे.या पूर्वी देखील त्यांना अनेक पुरस्कार मिळाले असून विदर्भात पार पडलेल्या अनेक कविसंमेलनात त्यांनी भाग घेतला आहे.

महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं काव्यकुंजच्या त्या एक जेष्ठ सदस्य आहे.दरम्यान कवयित्री शेंडे यांना नारीरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल सहज सुचलंच्या मुख्य मार्गदर्शिका मायाताई कोसरे ,अधिवक्ता मेघा धोटे ,संयोजिका रंज्जू मोडक सहसंयोजिका नलिनी आडपवार,कु.किरण साळवी यांच्यासह सहज सुचलंच्या अनेक सदस्यगणांनी
त्यांचे अभिनंदन केले आहे.