Gadchiroli dist@ news
• उमानूर वासीयांना मिळणार पिण्याचे शुद्ध पाणी
•भाग्यश्री आत्राम यांच्याहस्ते नळ योजनेचे लोकार्पण
✍️शंकर महाकाली
सुवर्ण भारत:संपादक
अहेरी:-तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या उमानूर ग्रामपंचायत अंतर्गत जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेचे काम पूर्ण झाले असून उमानूर वासीयांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळणार आहे.नुकतेच माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले.
उमानूर वासीयांना पिण्याच्या पाण्यासाठी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते.येथील नागरिकांनी मागील वर्षी पाण्याची टाकी उभारून नळ जोडणी करण्याची मागणी केली होती.येथील पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी गावात ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने जल जीवन मिशन अंतर्गत योजना राबविली.यासाठी मंत्री धर्मराव बाबा यांनी कोट्यवधी रुपयांची निधी उपलब्ध करून दिली होती.
आता गावकऱ्यांची पिण्याच्या पाण्याची समस्या दूर झाली असून गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.काम पूर्ण होताच माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले.यावेळी येथील सरपंच श्रीनिवास गावडे,मरपल्लीचे सरपंच अरुण वेलादी,रेगुलवाहीचे सरपंच ममीता नैताम,मरपल्लीचे उपसरपंच धनंजय डोंगरे,उमानूर चे उपसरपंच रवींद्र कोरेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येर्रावार,तालुका अध्यक्ष श्रीनिवास विरगोनवार तसेच उमानुर ग्रामपंचायत चे सदस्य तसेच प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.