Home Breaking News Chandrapur dist@ news • ठेकेदारी कामगारांवर होणारा अन्याय व त्यांच्या न्याय ...

Chandrapur dist@ news • ठेकेदारी कामगारांवर होणारा अन्याय व त्यांच्या न्याय मागण्या कडे दुर्लक्ष •ठेकेदारी कामगारावर अन्याय होऊ देणार नाही:माजी. खासदार नरेशबाबु पुगलिया

719

Chandrapur dist@ news
• ठेकेदारी कामगारांवर होणारा अन्याय व त्यांच्या न्याय मागण्या कडे दुर्लक्ष

•ठेकेदारी कामगारावर अन्याय होऊ देणार नाही:माजी. खासदार नरेशबाबु पुगलिया

✍️शंकर महाकाली
सुवर्ण भारत:संपादक

चंद्रपूर -चंद्रपूर जिल्ह्यातील अल्ट्राटेक सिमेंट, अंबुजा ( अदाणी ग्रुप) सिमेंट, ए.सी.सी सिमेंट ( अदानी ग्रुप), माणिकगड सिमेंट, दालमियाँ सिमेंट या सिमेंट उद्योगातील ठेकेदारी कामगारांची वेतन वाढ व इतर मागण्या संदर्भात व्यवस्थापनास जुना करार ३१ मार्च २०२३ रोजी संपण्या आगोदरच कामगार संघटना तर्फे १ मार्च २०२३ रोजी उपरोक्त कंपन्यातील व्यवस्थापनास मागण्यांबाबत निवेदन दिले. व्यवस्थापनाने कामगारांच्या मागण्यांची दखल न घेतल्यामुळे कामगार संघटने व्दारे डेप्युटी चिफ लेबर कमिशनर नागपूर ( सेंन्ट्रल) यांच्या कडे कामगार संघटनेने दाद मागितली. चिफ लेबर कमिशनर नागपूर येथे बैठकांमध्ये व्यवस्थापन वेळ काढू धोरण अवलंबित असल्याचे कामगार संघटनांनी चिफ लेबर कमिशनर यांच्या निदर्शनात आणले. ३० जानेवारी २०२४ रोजी फायनल सुनावणी साठी बैठक उपरोक्त सर्व व्यवस्थापन प्रतिनिधी आणि सिमेंट उद्योगातील कार्यरत एल. अन्ड टि. सिमेंट ( अल्ट्राटेक ) कामगार संघ, मराठा सिमेंट वर्क्स कामगार संघटना, एसीसी चांदा सिमेंट वर्क्स एमप्लाईज युनियन, मुर्ली सिमेंट कत्रांटी कामगार संघटना ( दालमियाँ ) या युनियनचे प्रतिनिधी यांची बैठक बोलाविली होती. पण श्रेयवाद तसेच राजकिय पोळी भाजण्यासाठी विजय वडेट्टीवार, सुभाष धोटे यांनी कट कारस्थान करून आपल्या हस्तकांव्दारे कामगारांची दिशाभूल केली व लोकांना हाताशी धरून अल्ट्राटेक सिमेंट व अंबुजा सिमेंट येथील कामावर जाणा-या कामगारांना मज्जाव केला.अशी माहिती मान्यता प्राप्त यूनियन कडून देण्यात आले.

ठेकेदारी कामगारांच्या वेतन वाढी बाबत आमच्याशी चर्चा करून त्वरीत निर्णय घ्या असा व्यवस्थापनास धमक्या देवून दम दिला. आणि सिमेंट प्लॉन्टच्या समोर धरणे देण्यास व सिमेंटचे ट्रक, रेल्वे रॅक भरण्यात अडथळा निर्माण केला.मान्यता प्राप्त कामगार संघटनेनी या गुंडप्रवृत्तीला बळी न पडता कामगारांमध्ये आपसात हाणामारी होवून काही अनूचित प्रकार घडू नये म्हणून पॅकिंग प्लॉन्टचे काम बंद ठेवले.
आहे सिमेंट कामगारांच्या समस्या बाबत माहीती नसतांना पोलिस संरक्षणात वातावरण दुषित करण्याचा भरपूर प्रयत्न केला.औद्योगिक कामगारांचे हे दोन्ही आमदार किती कैवारी आहे याचे ताजे उदाहरण म्हणजे दालमिया सिमेंट कंम्पनी मध्ये कामगारांचा पगार वाढी बाबत एक करार करून यांनी कामगारांची फसवणूक केली उदाहरणार्थ
१) ठेकेदारी कामगारांना फक्त २० रू प्रिती दिन पगार वाढ देवून पूर्वी ३८० रू मिळत होते ते आता ४०० रू रोजी मिळत आहे.
२) सिमेंट लोडींग कामगारांना पूर्वी ५०० रू मिळत होते आता फक्त ७७५ रू मिळत आहे. याउलट इतर सिमेंट कारख्यान्यात आमच्या जुन्या करारा नुसार ठेकेदारी कामगारांना प्रतिदिन ५५० रू ते ६५० रू. सोबत इतर सवलती मिळत आहे. तसेच सिमेंट लोडीग कामगारांना प्रतिदिन १५६० रु व इतर वेज बोर्ड सवलती व काही कामगारांना क्वॉटरर्सची सुविधा सुध्दा उपलब्ध आहे.
मागील कित्येक वर्षापासून युनियनचा माध्यमातुन कामगारांवर कधीच अन्याय झालेला नाही व समोर होणार ही नाही.अशी माहिती शिवचंद काळे,साईनाथ बुचे,देवेन्द्र गहलोत, व अजय मानवटकर यांनी दिली आहे.