Chandrapur city@ news
•उन्हाची पर्वा न करता खुल्या प्रांगणात भर दुपारी महिला व तरुणींनी ऐकले डॉ .शारदा येरमे, डॉ.अभिलाषा गावतुरे,वंदना हातगांवकर,रंजना किन्नाके व माया पेंदोर यांचे विचार !
• चंद्रपूरात पार पडला थाटात व उत्साहात आदिवासी महिलांचा स्नेहमिलन सोहळा!
•छोट्या कलावंतांनी सुरेख नृत्य सादर करुन जिंकली उपस्थितांची मने!
चंद्रपूर :किरण घाटे
चंद्रपूर शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या बिरसा मुंडा चौकात काल शनिवार दि.३ फेब्रुवारीला आदिवासी महिलांचा एक भव्य स्नेहमिलन सोहळा थाटात व उत्साहात पार पडला.खुल्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याला शहरातील आदिवासी महिला व तरुणींची लक्षणिय अशी उपस्थिती होती.या स्नेहमिलन कार्यक्रमाच्या निमित्ताने छोट्या कलावंतांचे सामुहिक नृत्य ठेवण्यात आले होते.कलावंतानी देखिल उत्तम व सुरेख नृत्य सादर करुन या वेळी उपस्थितांची मने जिंकली.भर उन्हात सुद्धा महिलांनी कार्यक्रम स्थळ न सोडता मान्यवरांचे विचार ऐकले.कार्यक्रम विलंबाने जरी सुरू झाला असला तरी कार्यक्रमाच्या शेवट पर्यंत कार्यक्रम स्थळी महिलांची गर्दी वाढतच गेली.हे येथे विशेष उल्लेखनीय आहे.आदिवासी महिला स्नेहमिलन सोहळ्यात प्रामुख्याने डॉ.शारदा येरमे, डॉ.अभिलाषा गावतुरे,यंग चांदा ब्रिगेडच्या शहर संघटिका वंदना हातगांवकर, रंजना किन्नाके , माया पेंदोर आदिंनी आपले विचार व्यक्त केले.
डाॅ.शारदा येरमे यांनी या वेळी कॅन्सर रोगाबाबत विशेष मार्गदर्शन केले.तर डॉ.अभिलाषा गावतुरे यांनी महिलांनी पुस्तक व वृत्तपत्रवाचनावर अधिक भर द्यावा असे आपल्या भाषणातून आवर्जून सांगितले.वंदना हातगांवकर यांनी आपल्या भाषणात वैशाली मेश्राम यांच्या उल्लेखनीय कार्याची प्रशंसा करीत महिलांनी सामाजिक कार्यात सदैव पुढाकार घ्यावा असे आवाहन या प्रसंगी केले.एव्हढेच नाही तर त्यांनी आदिवासी नृत्याची तोंडभरून स्तुती केली.आयोजित कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रामुख्याने रेखा कुमरे, वैशाली मेश्राम ,व पोर्णिमा तोडकर यांचे योगदान मोलाचे ठरले.स्नेहमिलन सोहळ्याला विमल काटकर , अस्मिता दोनारकर, सविता मसराम यांची उपस्थिती लाभली होती.महिला व तरुणींच्या सदैव स्मरणात राहावा असा हा स्नेहमिलन सोहळा थाटात पार पडला. सदरहु कार्यक्रमाला तालुक्यातील ग्रामीण भागातील काही आदिवासी महिला देखील उपस्थित झाल्या होत्या.