Home Breaking News Chandrapur city@ news • आज चंद्रपूरात आयटकचा भव्य मोर्चा !

Chandrapur city@ news • आज चंद्रपूरात आयटकचा भव्य मोर्चा !

144

Chandrapur city@ news
• आज चंद्रपूरात आयटकचा भव्य मोर्चा !

चंद्रपूर :किरण घाटे

आज शुक्रवारला चंद्रपूर शहरात आयटकच्या वतीने एका भव्य मोर्चाचे आयोजन केले आहे .हा भव्य मोर्चा दुपारी १२ वाजता स्थानिक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा मेन रोड चंद्रपूर येथून निघत असल्याचे आयटकचे नेते रविन्द्र उमाठे यांनी सांगितले आयोजित केलेल्या मोर्चात आशा वर्कर, गट प्रवर्तक , शालेय पोषण आहार कर्मचारी , बालवाडी अंगणवाडी कर्मचारी , राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटीअधिकारी व कर्मचारी , महाराष्ट्र राज्य किसान सभा ,बांधकाम कामगार ,कोळसा उद्योगातील संयुक्त खदान मजदूर संघ , महा.राज्य .विद्युत वर्कर फेडरेशनचे कर्मचारी व अधिकारी सहभागी होत आहेत.सदरहु मोर्चाला बहुसंख्य कर्मचारी व कामगारांनी हजर राहण्याचे आवाहन चंद्रपूर आयटकचे जिल्हा कार्याध्यक्ष काॅ.रविन्द्र उमाठे यांनी केले आहे.