Chandrapur city@ news
• भारतातील सर्व निवडणुका बॅलेट पेपर पध्दतीने घ्या- नरेन गेडाम यांची मागणी!
• चंद्रपूर जिल्हाधिकारी यांच्या मार्फत गेडाम यांनी दिले प्रेसिडेंट ऑफ इंडिया दिल्ली ,प्राईम मिनिस्टर ऑफ द युनियन गव्हर्मेंट ऑफ इंडिया, चिफ जस्टीस ऑफ इंडिया व आयुक्त भारत निवडणूक आयोग यांना निवेदन !
चंद्रपूर: किरण घाटे
भारतातील सर्व निवडणुका ह्या बॅलेट पेपर पद्धतीने घेण्यात याव्या व EVM पध्दती पूर्णपणे बाद करण्यात यावी अश्या आशयाची मागणी चंद्रपूरचे मताधिकार प्राप्त एक जागरूक नागरिक नरेन ढेकलूदास गेडाम यांनी आज जिल्हाधिकारी यांच्या मार्फत एका लेखी निवेदनातून प्रेसिडेंट ऑफ इंडिया, दिल्ली, प्राईम मिनिस्टर ऑफ दि युनियन गव्हर्मेंट ऑफ इंडिया, चिफ जस्टिस ऑफ इंडिया व आयुक्त भारत निवडणूक आयोग यांच्या कडे केली आहे.त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि ईव्हीएम पद्धतीच्या निवडणुकीत मी ज्या चिन्हावर ज्या उमेदवाराला मत दिलेले असते ते मत त्याच उमेदवाराला मिळाले की नाही हे मला खात्रीपूर्वक समजून येत नाही .व्ही.व्ही .पॅटमुळेही बुद्धीचे, मनाचे पूर्ण समाधान होत नाही .मतमोजणीच्या वेळी किंवा फेर मोजणीच्या वेळी हे विशिष्ट अनुक्रमांकाचे माझे मत आहे हे नक्की पाहता येत नाही .त्याची पडताळणी करण्याची आवश्यकता असल्यास पडताळणी ही करता येत नाही. व ते कोणी खात्रीलायक पद्धतीने दाखवू शकत नाही अशा प्रकारे बेरजेच्या आकड्यात माझे मत विलीन होऊन अस्तित्वहीन होते .मी स्वीकारू शकत नाही बॅलेट पेपर पद्धतीच्या निवडणुकीत माझी मतपत्रिका बॅलेट बॉक्स मध्ये असल्याचा मला नक्की विश्वास असतो .मतमोजणीच्या अथवा फेरमोजणीच्या वेळी माझे मत म्हणजे मी वापरलेली मतपत्रिका भौतिक स्वरूपाचा पुरावा म्हणून नजरेपुढे असते .आणि ते पाहण्यासाठी त्या ठिकाणी नियुक्त असलेल्या मोजणी प्रतिनिधीच्या नजरे पुढे माझी मतपत्रिका असते. लोकशाहीमध्ये आपल्या मताची नेमके काय झाले याबाबत शंका असणे हे कारण लोकशाही व्यवस्थेला विफल करण्यास पुरेसे ठरते .आणि आधुनिकतेच्या व तंत्रयुगाच्या, टेक्नॉलॉजीच्या नावाखाली मी अशी जोखीम पत्कराला मुळीच तयार नाही.
माझा ईव्हीएम पद्धतीच्या निवडणूक प्रक्रियेवर मुळीच विश्वास नाही. भारतासारख्या परंपरागत शोषण केंद्री समाज व्यवस्थेच्या देशात मतांची धांदली करून शोषणवादी विचारसरणीचे पक्ष व त्यांचे उमेदवार सत्य व कब्जा मिळण्यासाठी कोणत्याही थराला जातात हे मी व भारतातील माझ्यासारख्या नागरिक सातत्याने अनुभवत असतात आणि याची आपला देखील पुरेपूर कल्पना आहे. म्हणूनच याबाबत मला कोणाच्याही गोडी गुलाबीच्या शब्दांवर आंधळेपणाने विसंबून राहायचे नाही तसेच नागरिकांच्या आक्षेपातील पर्वा न करता आपलेच धोरण लादण्याचा कोणाच्याही ,कोणत्याही व्यक्तीचा अथवा यंत्रणेचा हेकेखोर प्रयत्न मी खपून घेणार नाही. यास्तव येत्या सर्व निवडणुकांमध्ये मला ,मी दिलेल्या माझ्या मताची खातारजमा करण्याची सोय असलेली माझ्या मन आणि बुद्धीचे नि:शंक समाधान करणारी, प्रत्यक्ष भौतिक अस्तित्व असलेली कागदी मतपत्रिका माझे मत नोंदविण्यासाठी देण्यात यावी
या दृष्टीने निवडणूक आयोगाला येत्या सर्व निवडणुका बॅलेट पेपर पद्धतीने घेण्याची परिपूर्ण तयारी करण्याचे सक्त निर्देश देण्यात यावे असे शेवटी निवेदनात गेडाम यांनी नमूद केले आहे.