Chandrapur city@ news
• युवा नेता अशिद मेश्राम यांचे उपोषण सुरूच !
•उपोषणाचा आजचा ५वा दिवस
•महेश हजारेंनी घेतली अपर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडेंची भेट !
चंद्रपूर: किरण घाटे
काग गावातील विविध रास्त मागण्यांसाठी युवा नेता तथा रोखठोक प्रहार कामगार संघटनेचा चिमूर तालूका प्रमुख अशिद अमरदिप मेश्राम यांनी गेल्या १९फेब्रूवारी पासून काग मुक्कामी लाक्षणिक उपोषण आरंभ केले असून आज या उपोषणाचा पाचवा दिवस आहे.अनेकांनी मेश्राम यांच्या उपोषणाला आपला पाठिंबा जाहीर केला आहे.दरम्यान आज शुक्रवारी चंद्रपूर जिल्हा प्रहार कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेश हजारे व त्यांच्या काही पदाधिकारी व सदस्यगणांनी अपर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांची भेट घेतली व त्यांच्या समोर काग येथील नगर परिषदेशी संबंधित असलेल्या मागण्यांचा पाढाच वाचला .तीन महिण्या अगोदर व त्या ही पूर्वी अशिद मेश्राम यांनी नगर परिषदेला रास्त मागण्यांच्या संदर्भात निवेदन सादर केले पण येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या मागण्यांच्या बाबतीत सातत्याने दुर्लक्ष केल्याचे महेश हजारे यांनी अपर जिल्हाधिका-यांना या भेटी दरम्यान सांगितले.
चिमूरच्या नगर परिषदेच्या मुख्याधिकारी सुप्रिया राठोड यांच्या कडून शासकीय कामात वेळीच सहकार्य मिळत नसल्याची खंत या वेळी हजारे यांनी आपल्या बोलण्यातून व्यक्त केली.उद्या शनिवारला सकाळी ९ वाजता रोखठोक प्रहार कामगार संघटनेचे अध्यक्ष महेश हजारे हे काग येथे भेट देत असल्याचे समजते.