Home Breaking News Chandrapur city@ news • मनपाचा “तो ” बहुचर्चित लाचखोर लिपीक...

Chandrapur city@ news • मनपाचा “तो ” बहुचर्चित लाचखोर लिपीक अडकला एसीबीच्या जाळ्यात ! • चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याची यशस्वी कारवाई! •लाचखोर लिपीकाने मागितली होती मालमत्तेवर नांव चढविण्यासाठी 15 हजार रुपयांची लाच !

206

Chandrapur city@ news
• मनपाचा “तो ” बहुचर्चित लाचखोर लिपीक अडकला एसीबीच्या जाळ्यात !
• चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याची यशस्वी कारवाई!
•लाचखोर लिपीकाने मागितली होती मालमत्तेवर नांव चढविण्यासाठी 15 हजार रुपयांची लाच !

चंद्रपूर :किरण घाटे

चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज शुक्रवारला रचलेल्या सापळ्यात महिण्याकाठी गलेलठ्ठ पगार उचलणारा मनपाचा एक लिपीक जाळ्यात अडकला . आता याच महिन्यात जाळ्यात लटकणा-या जिल्ह्यातील लाचखोर कर्मचाऱ्यांची संख्या तीनवर पोहचली आहे.

एसीबीच्या जाळ्यात अडकलेल्या या लाचखोराचे नांव फारुक अहमद मुस्ताफ अहमद शेख असे आहे .तो कनिष्ठ लिपीक म्हणून महानगरपालिका झोन क्रं एक संजय गांधी मार्केट मध्ये कार्यरत होता.या बाबत हाती आलेल्या माहितीनुसार असे कळते कि एका तक्रारदाराला मालमत्तेवर स्वता व मुलांचे नांव दर्ज करावयाचे होते.लाचखोर लिपीकाने या कामासाठी चक्क १५ हजार रुपयांची लाच मागितली होती. परंतु तक्रारदारास त्या कनिष्ठ लिपीकास लाच देण्याची मुळीच इच्छा नव्हती.संबंधित तक्रारदाराने थेट चंद्रपूर एसीबी कार्यालयाची मदत घेत या लाचखोरास वेळीच योग्य धडा शिकविला.
उपरोक्त यशस्वी व धडाकेबाज कारवाई नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर, अप्पर पोलीस अधीक्षक संजय पुरंदरे ,लाच प्रतिबंधक विभाग चंद्रपूरच्या उपअधीक्षक श्रीमती मंजुषा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जितेंद्र गुरनूले ,संदेश वाघमारे ,वैभव घाडगे ,राकेश जांभुळकर , रमेश दुपारे , अरुण हटवार, नरेश नन्नावरे, राज नेवारे सतीश शिडाम व पथकातील अन्य कर्मचा-यांनी केली.सदरहु कारवाईमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील शासकीय सेवेतील अधिकारी व कर्मचारी वर्गात एकच खळबळ उडाली आहे .दरम्यान चंद्रपूर येथील एसीबीच्या धडाकेबाज कारवाईचे आज शहरातील नागरीकांनी स्वागत केले आहे.लाचखोरीत अडकलेल्या या कर्मचाऱ्यास सेवेतून निवृत्त होण्यास सहा वर्षांचा कालावधी शिल्लक होता.