Chandrapur city@ news
• महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक व कंत्राटी कामगार सेनेच्या वतीने A.B.U. कन्स्ट्रक्शनच्या विरोधातील बेमुदत साखळी उपोषण यशस्वी
• चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील उप मुख्य अभियंता शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली अधिकारी व कामगार पदाधिकारी यांच्या बैठकीत लिखित स्वरुपात सर्व मागण्या मान्य
सुवर्ण भारत: शंकर महाकाली
चंद्रपुर :- येथील चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील A.B.U. कन्स्ट्रक्शनचे कंत्राटदार भरत पटेल व चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील कामगार कल्याण अधिकारी वंजारी यांच्या विरोधात शिवसेनेचे चंद्रपुर जिल्हाप्रमुख तथा महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक व कंत्राटी कामगार सेनेचे अध्यक्ष बंडू हजारे तसेच शिवसेना भारतीय कामगार संघटनेचे चंद्रपुर जिल्हाध्यक्ष तथा शिवसेना चंद्रपुर तालुका प्रमुख, संतोष पारखी यांच्या नेतृत्वात चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या मेजर गेट समोर 20 फेब्रुवारी पासून कामगारांना पूर्व सुचना/नोटिस न देता कामावरून कमी करणे, महाराष्ट्र शासनाच्या कायद्यानुसार किमान वेतन/पगार न देणे. तसेच अनेक मुद्द्यासह बेमुदत साखळी उपोषण सुरु करण्यात आले होते. त्यासंदर्भात आज दि.21 फेब्रुवारीला चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता कुमरवार यांच्या आदेशानुसार उप मुख्य अभियंता शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली अधिकारी व कामगार पदाधिकारी यांच्या बैठकीत अनियमित कामगार 1 ते 8 कामगारांना नियमित काम, सर्व कामगारांचे किमान वेतनानुसार पगार, कामगारांची थकीत रक्कम देण्यात येईल असे अधिकारी व कामगार पदाधिकारी यांच्या बैठकीत लिखित स्वरुपात सर्व मागण्या मान्य करण्यात आल्यामुळे उप मुख्य अभियंता शिंदे यांनी आपला प्रतिनिधी म्हणून नरेंद्र तोडासे यांना उपोषण मंडपाला पाठवुन A.B.U. कन्स्ट्रक्शनच्या विरोधातील उपोषणकर्ते कामगार यांना शरबत पाजून बेमुदत साखळी मागे घेण्यात आला*
सविस्तर वृत असे की, चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील A.B.U. कन्स्ट्रक्शनचे कंत्राटदार भरत पटेल यांच्या कंपनीला C.M.R. यूनिट ८/९ मध्ये A.M.C. कंत्राटमधील कामगारांना पूर्व सुचना/नोटिस न देता कामावरून कमी करण्यात आले. तसेच सदर कंत्राट मालकाची कामगाराचा पैशाच्या भ्रष्टाचार केलेल्या कंत्राटदार व संबंधीत अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्यात यावी.
त्याचप्रमाणे A.B.U. कन्स्ट्रक्शनचे कंत्राटदार भरत पटेल कंपनी मालक व अधिकारी यांचे संगनमताने कामगारांचे शोषण होत असून सदर कंपनी ही प्रोजेक्टमधील काम पूर्ण झाले, तेव्हा कामगाराना P. F. व फायनल पेमेंट नियमानुसार करणे आवश्यक असल्याने ते सर्व कंत्राटी कामगाराचे पैसे भरत पटेल यांनी अधिका-याला हाताशी धरुन स्वतः व संबंधित अधिकारी यांनी विल्हेवाट लावली त्यापैशाची वसूली करुन कामगारांना परत करावी. व सध्या चालू असलेल्या C.M.R. यूनिट ८/९ या A.M.C. कंत्राटमध्ये सन डिसेंबर २०२२ ते २०२३ पासुन काम करीत असून त्यांचे लोकांचे गेटपास न बनविता, त्यांना कामावरुन काढून त्यांचे जागेवर नविन कामगारांना लावून पैसे खाण्यासाठी ठेकेदार व संबंधित साईड वरील अधिकारी हयांनी बनविल्याने त्यांचेवर उपासपारीची वेळ आली. त्याकरीता नियमित काम करीत कामागारांचे गेटपास बनविण्यात यावे.
तसेच भरत पटेल व त्या संबंधित अधिकारी यांनी मिळून महिण्याचे १,१३,५००/- एवढे पैसे कामगारांचे खाल्ले असून त्याची सक्तीने वसूली करुन त्यांचेवर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी. तसेच पेमेंट स्लीपमध्ये कामगारांच्या नावावर अॅडव्हांस दाखविला असून हे प्रत्यक्षात मात्र त्यांनी कोणत्याही कामगारांस दिलेला नसुन त्याच्याकडून गेल्या १४ – १५ महिण्याचा कामगारांचे १६ लाख रुपये वसूल करण्यात येवुन देण्यात यावे. व कामगारांना त्वरीत कामावर पूर्ववत घेण्यात यावे. या सर्व मागण्या चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील उप मुख्य अभियंता शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली अधिकारी व कामगार पदाधिकारी यांच्या बैठकीत लिखित स्वरुपात सर्व मागण्या मान्य केल्याने कामगारांच्या वतीने शिवसेनेचे चंद्रपुर जिल्हाप्रमुख तथा महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक व कंत्राटी कामगार सेनेचे अध्यक्ष बंडू हजारे तसेच शिवसेना भारतीय कामगार संघटनेचे चंद्रपुर जिल्हाध्यक्ष तथा शिवसेना चंद्रपुर तालुका प्रमुख, संतोष पारखी, संतोष ढोक, आशिष गोमासे, जगदीश सहारे, वैभव सोंनकुसरे, नितीन मेश्राम यांचे आभार मानण्यात आले.