•चंद्रपूरच्या प्रियदर्शन गहुकरची शिक्षण क्षेत्रात उंच भरारी!
•महाविद्यालयाने केला नागपूरात प्रियदर्शनचा थाटात सत्कार!
नागपूर: किरण घाटे
कला ,साहित्य, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील गुणवंत व कलावंतांना सदैव प्रोत्साहन व प्रेरणा देणा-या महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं योगागृपच्या मुख्य संयोजिका -चंद्रपूर निवासी वैजयंती गहुकर यांचे चिरंजीव प्रियदर्शन विकासराव गहुकर यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या विशेष उल्लेखनीय कामगिरी बद्दल नुकताच नागपूरात त्याचा सत्कार करण्यात आला.प्रियदर्शन गहूकर हा उपराजधानी नागपूरच्या श्री .रामदेव बाबा महाविद्यालयात उच्च शिक्षण घेत असून तो MCA करीत आहे.त्याला MCA मध्ये 97टक्के गुण मिळाले असून,
अकॅडमी मॅनेजमेंट(मेरिट स्कॉलरशिप) प्राप्त झाली आहे.नागपूर मुक्कामी
रोख रक्कम दहा हजार रुपये देऊन त्याचा मान्यवरांच्या उपस्थितीत थाटात सत्कार करण्यात आला.सहज सुचलं महिला व्हाॅट्सअप गृपच्या वैजयंती गहुकर यांचा तो मोठा मुलगा असून प्रियदर्शन हा युनिव्हर्सिटी टॉपर देखील आहे.त्याच्या विशेष शैक्षणिक कामगिरी बद्दल अनेकांनी त्याचे अभिनंदन केले आहे.