Home Breaking News दिनेश कांबळें लोकसाहित्यिक पुरस्काराने सन्मानित

दिनेश कांबळें लोकसाहित्यिक पुरस्काराने सन्मानित

92

दिनेश कांबळें लोकसाहित्यिक पुरस्काराने सन्मानित

चंद्रपूर : किरण घाटे

मराठबोली पुणे द्वारे दि. २५ फेब्रुवारी२०२४ रोजी पुणे येथील पत्रकार भवन येथे संस्थेचा एकोणिसाव्या वर्धापन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रसंगी कला ,साहित्य, शिक्षण, शेती, समाजसेवा,उद्योग व्यवसाय, आदी विविध क्षेत्रातील हरहुन्नरी व्यक्तिमत्वाचा संस्थेतर्फे गौरव करण्यात आला. डोंगरगाव येथील (ता.सिल्लोड जि. छ.संभाजीनगर) कवी दिनेश कांबळे यांचा लोकसाहित्यिक पुरस्कार २०२४ चा देऊन या वेळी सन्मानीत करण्यात आले.
आयोजित पुरस्कार सोहळा प्रसंगी उद्योगमहर्षी डॉ. मंगेश आमले यांची प्रमुख पाहूणे म्हणून तर प्राचार्य भाऊसाहेब जाधव हे विशेष उपस्थित होते. प्रसंगी संस्थेचे सर्वेसर्वा परमेश्वर उमरदंड यांनी आणि रजनी ढोंगडे यांनी संस्थेच्या कार्याला उजाळा दिला. तसेच सर्व पुरस्कारप्राप्त मान्यवरांचे अभिनंदन केले. जयंत येलुलकर आणि डॉ. मंगेश आमले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्यात.
मान्यवरांच्या हस्ते आकर्षक असे मानपत्र, शाल, पुस्तक देऊन दिनेश कांबळे यांचा सन्मान करण्यात आला. सदरहु सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लाभली होती.

दिनेश कांबळे मनातली काव्य अक्षरे साहित्य मंच महाराष्ट्र राज्यचे प्रशासक तसेच साहित्य सारथी कला मंच पुणे शाखेचे कार्याध्यक्ष असून या मंचाद्वारे सातत्याने साहित्यिक उपक्रम राबवीत असतात. कवी कांबळे यांना यापूर्वी घे.भरारी साहित्य मंच महाराष्ट्र , शब्दसुमने साहित्य मंच मंगळवेढा, प्रज्ञा गझलमंच, ललित कला फाऊडेशन ठाणे द्वारे सुरेश भट पुरस्कार आदिं विविध साहित्यिक संस्थाद्वारे पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आलेले आहे. दिनेश कांबळे यांच्या सत्कार सोहळ्यानिमित्त तसेच साहित्यिक कार्यासाठी मित्र परिवारातर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.