Home Breaking News •आशा वर्कर व गटप्रवर्तकांचे आंदोलन सुरूच •ठिय्या आंदोलनाचा आजचा 45 वा...

•आशा वर्कर व गटप्रवर्तकांचे आंदोलन सुरूच •ठिय्या आंदोलनाचा आजचा 45 वा दिवस ! •शासनाने अद्याप दखल घेतली नाही ! •मुंबई नागपूर व चंद्रपूरात महिलांचा आक्रोश वाढतोय !

74

•आशा वर्कर व गटप्रवर्तकांचे आंदोलन सुरूच
•ठिय्या आंदोलनाचा आजचा 45 वा दिवस !
•शासनाने अद्याप दखल घेतली नाही !
•मुंबई नागपूर व चंद्रपूरात महिलांचा आक्रोश वाढतोय !

चंद्रपूर: किरण घाटे

आशा वर्कर व गटप्रवर्तकांचे रास्त मागण्यांसाठी राज्यभर आंदोलन सुरू असून चंद्रपूर जिल्ह्यातील आशा वर्कर व गटप्रवर्तकांनी देखील या आंदोलनात आपला सहभाग नोंदविला आहे.दरम्यान चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्या गेल्या काही दिवसांपासून ठिय्या आंदोलन करीत आहे.या आंदोलनाचा आजचा 45 वा दिवस असल्याचे रविन्द्र उमाठे यांनी सांगितले.मुंबई येथील आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनात चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील अनेक आशा वर्कर व गटप्रवर्तक सहभागी झाल्या आहेत. नागपूर उपराजधानीत देखील आशा वर्कर व गटप्रवर्तकांचे आंदोलन सुरू आहे.मागण्यांची पूर्तता तातडीने न झाल्यास चंद्रपूर जिल्ह्यात आंदोलन अधिक तीव्र करु असा इशारा काॅ. रविन्द्र उमाठे यांनी शासन व प्रशासनाला दिला आहे.
मुंबईच्या ही आझाद मैदानावर गेल्या तीन आठवड्यांपेक्षा अधिक कालावधी पासून आशा वर्कर व गटप्रवर्तकांचे आंदोलन सुरू असून अद्यापही शासनाने त्यांच्या रास्त मागण्यांची दखल घेतली नाही . त्यामुळे दिवसेंदिवस आशा वर्कर व गटप्रवर्तक मध्ये शासना विषयी आक्रोश वाढत असल्याचे दिसून येते.आम्हाला आता जीआरचं हवा अशी त्यांची एकमुखी मागणी आहे.