Home Breaking News 💞हृदयी प्रीत जागता

💞हृदयी प्रीत जागता

419

💞हृदयी प्रीत जागता💞

हृदयी प्रीत जागता
मनी वसंत खुलतो,
आठवता मनोमनी
राजहंसा तू डूलतो.(१)

भास जरी मज असे
नित्य तुलाच पाहते,
जरी न जाणती मन
धुंदी तुझीच राहते.(२)

रात्रं दिन ओढ तुझी
माझ्या मनास लागते,
प्रीत नवी पांघरूनी
क्षणोक्षणी मोहरते.(३)

नाद चित्र रेखाटूनी
गीत तुझेच गुंजते,
विरहात प्रिया तुझ्या
नेत्री आसवे कोंदते.(४)

पुन्हा पुन्हा तू येवूनी
स्वप्नी महाल बांधतो,
काळे कुंतल छेडूनी
रोमरोम शहारतो.(५)

💠🌀🟡🟢वैशाली राऊत सहज सुचलं सदस्य नागपूर💠 संकलन -उज्वला निमगडे दुर्गापूर-चंद्रपूर