Home Breaking News Nagbhid taluka@ news •ट्विंकल इंग्लीश स्कूल नागभीड येथे अंतराळाची महायात्रे तुन जाणला...

Nagbhid taluka@ news •ट्विंकल इंग्लीश स्कूल नागभीड येथे अंतराळाची महायात्रे तुन जाणला • शाळेतील विद्यार्थ्यांनी विज्ञानाचा प्रवास….

96

Nagbhid taluka@ news
•ट्विंकल इंग्लीश स्कूल नागभीड येथे अंतराळाची महायात्रे तुन जाणला
• शाळेतील विद्यार्थ्यांनी विज्ञानाचा प्रवास….

✍️अरुण रामुजी भोले
सुवर्ण भारत: तालुका प्रतिनिधी, नागभींड

नागभिड: समिधा सेवा संस्था नागभीड व्दारा संचालित श्रीमती रामप्यारीदेवी आसारामजी काबरा ट्विंकल इंग्लिश स्कूल नागभीड येथे दि. २९ फेब्रुवारी रोजी विज्ञान भारती व इसरो यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञान प्रदर्शनी ” अंतराळाची महायात्रा ” उपक्रम राबविण्यात आला.

‘अंतराळाची यात्रा’ बसमध्ये विज्ञानाच्या विविध प्रतिकृती, रांगोळी, मिर्तथि सेल्फी पाईट पाहण्यासाठी परिसरातील अनेक शाळांसह पालक व नागरिकांनी गर्दी केली होती.
अंतराळाची यात्रा म्हणजेच SPACE ON WHEELS या फिरत्या प्रदर्शनी निमित्त विविध स्पर्धांचे देखील आयोजन करण्यात आले होते.

स्पेस ऑन व्हील चे उद्घाटन तथा बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती चे बिडीओ संजय पारवे, उद्घाटक प्रा.डाॅ.अतुल नागपुरे राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय नागभीड, विशेष अतिथी म्हणून विकास कुंमरे बिआरसी नागभीड, प्रमुख अतिथी म्हणून समिधा सेवा संस्थेचे अध्यक्ष गणेश तर्वेकर, सचिव अजय काबरा, प्राचार्या शुभांगी पोहेकर , मुख्याध्यापीका संगीता नारनवरे
उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना इसरो च्या अनेक प्रकल्पांची माहिती मिळावी आणि भारताची विज्ञान विषयात झालेली प्रगती विद्यार्थ्यांना माहीत व्हावी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी असे आयोजन करण्यात येतात. ट्विंकल इंग्लिश स्कूल ने या आयोजनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भविष्याचा विचार करण्याची उत्तम संधी उपलब्ध करून दिली असे प्रतिपादन डॉ अतुल नागपुरे यांनी या प्रसंगी केले. उपस्थित मान्यवरांनी यावेळी यथोचित मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक प्रा.शैलेश भुरसे यांनी केले. विविध विजेत्यांना स्पर्धेतील मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले. सूत्रसंचालन कु.अवंती गेडाम यांनी केले, आभार शिक्षक दिपक कावडकर यांनी मानले.

*हे आहेत विजेते*

चित्रकला वर्ग सहा ते आठ मध्ये प्रथम आर्या धकाते, द्वितीय
माही सेलघरे, तृतीय तृप्ती विनोद भोपये, तर नऊ ते अकरावी
गटात प्रथम आदित्य शिंपी, द्वितीय अंजली प्रधान, तृतीय श्रृती नान्हे, रांगोळी स्पर्धा वर्ग सहावी ते आठी प्रथम तेजस्विनी सेलोटे, द्वितीय इशांत कायरकर तृतीय सानवी दुपारे, रांगोळी स्पर्धा नववी ते अकरावी प्रथम गारगी गजपुरे, द्वितीय साद्धी धकाते, तृतीय क्रमांक स्नेहा नान्हे यानी
पटकावला.