Home Breaking News Nagbhid taluka @news • आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांच्याकडून शिवटेकडी नागभीड येथे...

Nagbhid taluka @news • आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांच्याकडून शिवटेकडी नागभीड येथे महाशिवरात्री महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवस्थान परिसरातील विविध स्थळांची पाहणी

158

Nagbhid taluka @news
• आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांच्याकडून शिवटेकडी नागभीड येथे महाशिवरात्री महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवस्थान परिसरातील विविध स्थळांची पाहणी

✍️अरुण रामुजी भोले
नागभीड तालुका प्रतिनिधी

नागभीड—-आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांनी शिवटेकडी, नागभीड येथे श्री. शिवशंकरजींचे मनोभावे दर्शन घेतले आणि नागभीड महाशिवरात्री महोत्सव २०२४ च्या पार्श्वभूमीवर देवस्थान परिसरातील कार्यक्रमाच्या विविध नियोजित स्थळांची पाहणी करून संपूर्ण पूर्वतयारी व नियोजनासंदर्भात आढावा घेतला. आज कार्यक्रम दिनांक 7 ते 19 मार्च 2024 पर्यंत आयोजित केलेला आहे, यावेळी पोलीस निरिक्षक विजय राठोड, भाजपा पदाधिकारी तथा कार्यकर्ते आणि महोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांशी विविध कार्यक्रमांच्या नियोजनासंदर्भात सविस्तर चर्चा करून आवश्यक सूचना आमदार महोदय यांनी दिल्या.