Home Breaking News Gadchiroli(Aheri)news •चार कोटींच्या निधीतून तालुका प्रशिक्षण पथक इमारतीचे होणार बांधकाम •मंत्री...

Gadchiroli(Aheri)news •चार कोटींच्या निधीतून तालुका प्रशिक्षण पथक इमारतीचे होणार बांधकाम •मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्याहस्ते भूमिपूजन

84

Gadchiroli(Aheri)news
•चार कोटींच्या निधीतून तालुका प्रशिक्षण पथक इमारतीचे होणार बांधकाम

•मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्याहस्ते भूमिपूजन

✍️शंकर महाकाली
सुवर्ण भारत:संपादक

अहेरी:-तालुका मुख्यालयातील महिला व बाल रुग्णालय जवळ लागून असलेल्या जमिनीवर तब्बल ४ कोटींच्या निधीतून तालुका प्रशिक्षण पथक मुख्य इमारतीचे बांधकाम केले जाणार आहे.रविवारी (१० मार्च) रोजी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्याहस्ते भूमिपूजन संपन्न झाले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री आत्राम,माजी प स सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम,तालुका आरोग्य अधिकारी डॉ किरण वानखेडे,राकॉचे अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येरावार,अहेरी तालुका अध्यक्ष श्रीनिवास विरगोनवार, नगरसेवक श्रीनिवास चटारे,आरोग्य विभागाचे अधिकारी,कर्मचारी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अहेरी उपविभागात अहेरी,मुलचेरा, एटापल्ली,भामरागड व सिरोंचा या पाच तालुक्यांचा समावेश असून ही तालुके जिल्हा मुख्यालय पासून जवळपास २०० ते २५० किलोमीटर अंतरावर आहेत. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध प्रशिक्षणसाठी या भागातील कर्मचाऱ्यांना मोठे अंतर कापून जिल्हा मुख्यालयात जावे लागत आहे.अहेरी सारख्या परिसरात तालुका प्रशिक्षण पथक झाल्यास या भागातील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार य उदात्त हेतूने आरोग्य विभागाने यासाठी पुढाकार घेतला.

विशेष म्हणचे या इमारत बांधकामासाठी जागा उपलब्ध नव्हती.वेळोवेळी पाठपुरावा करून देखील जागा न मिळाल्याने अखेर मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी पुढाकार घेऊन वन विभागाकडून जागा उपलब्ध करून दिल्याने हा प्रश्न मार्गी लागला.अहेरी ते आलापल्ली मार्गावरील महिला व बाल रुग्णालय लागत दोन हेक्टर जमीन आरोग्य विभागाला मिळाली असून याठिकाणी तालुका प्रशिक्षण पथक मुख्य इमारत उभी केली जाणार आहे.

केवळ तालुका प्रशिक्षण पथक नव्हे तर या जागेवर औषध भांडार, ट्रामा सेंटर आणि व्हॅक्सिन सेंटर याच परिसरात उभारले जाणार असल्याने
सिरोंचा, भामरागड आणि एटापल्ली सारख्या तालुक्यातील आरोग्य सेवा अधिक बळकट होणार आहे.याच परिसरात महिला व बाल रुग्णालय आणि तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या इतर सुविधा मिळणार असल्याने नागरिकांच्या अनेक समस्या दूर होणार आहेत.

◆उर्वरित कामासाठी निधी उपलब्ध करून देणार

तब्बल चार कोटी रुपयांच्या निधीतून तालुका प्रशिक्षण पथक मुख्य इमारतीचे या ठिकाणी बांधकाम केले जाणार आहे वनविभागाकडून दोन हेक्टर जमीन मिळाल्याने याच ठिकाणी ट्रॉमा सेंटर औषध भंडार व्हॅक्सिन सेंटर होणार असल्याने पुढील कामासाठी मोठी निधी लागणार आहे त्यासाठी तसे प्रस्ताव सादर करा आरोग्य मंत्री सोबत चर्चा करून निधी उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी दिले. विशेष म्हणजे दक्षिण भागातील पाचही तालुक्यांना जिल्हा मुख्यालयात न जाता अहेरी मुख्यालयातच सर्व बाबी उपलब्ध होतील या उद्देशाने नियोजन करा असे निर्देशही त्यांनी आरोग्य विभागाला दिले आहेत.