Home Breaking News • दिव्यांगाना सन्मानाने जगण्यासाठी व त्यांच्या न्यायहक्कांसाठी रोखठोक प्रहार दिव्यांग संघटनेचे घूग्घूस...

• दिव्यांगाना सन्मानाने जगण्यासाठी व त्यांच्या न्यायहक्कांसाठी रोखठोक प्रहार दिव्यांग संघटनेचे घूग्घूस नगर परिषद समोर एक दिवसीय धरणे आंदोलन! •आंदोलनाला आले यश

81

• दिव्यांगाना सन्मानाने जगण्यासाठी व त्यांच्या न्यायहक्कांसाठी रोखठोक प्रहार दिव्यांग संघटनेचे घूग्घूस नगर परिषद समोर एक दिवसीय धरणे आंदोलन!
•आंदोलनाला आले यश

चंद्रपूर :किरण घाटे

विदर्भाच्या चंद्रपूर जिल्ह्यात औद्योगिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घूग्घूस नगर परिषदेकडे आजच्या घडीला 170 दिव्यांग बांधवाची नोंद असल्याचे समजते.
सदरहु नगर परिषदेत दिव्यांगासाठी कुठल्याही प्रकारच्या सोयी- सुविधा उपलब्ध नाहीत,यात दिव्यांगासाठी वाशरूम नाही, दिव्यांगासाठी व्हिल चेअर नाही त्यामुळे पायर्‍यांवरच बसुनच संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांना आपल्या समस्या सांगाव्या लागतात. इतकेच नाही तर दिव्यांगाना मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र प्रत्यक्षात दिसून येते.याकडे नगर परिषद घुग्घुसचे पूर्णता दुर्लक्ष होत असल्याचा आरोप रोखठोक प्रहार दिव्यांग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेश हजारे यांनी आज या प्रतिनिधीशी बोलताना घूग्घूस मुक्कामी केला.
निवेदन देऊन ही दुर्लक्ष होत असल्याचे दिसताच रोखठोक प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने आज मंगळवारला एक दिवसीय धरणे आंदोलन करण्याचा इशारा लेखीस्वरुपात नगर परिषद घुग्घुसला देण्यात आला होता.
नगर परिषद घुग्घुसने दिव्यांगाच्या समस्या ऐकुन घेण्यसाठी स्वतंत्र सोय करावी.

🔲⬜घुग्घुस येथील रहिवाशांना रोजगारांसाठी 200 स्के.फुट जागा उपलब्ध करून द्यावी.

बेघर दिव्यांगाना हक्काचे घर बांधून द्यावे.

दिव्यांगासाठी स्वतंत्र पेंशन योजना सुरू करावी व 5000 रू प्रति महिना द्यावा.

दिव्यांगांना घर टॅक्स,पाणी कर, व वीज बिल माफ करावे.

दिव्यांगांना घुग्घुस नगर परिषदेच्या निवडणुकीत आरक्षण द्यावे.

दिव्यांगाना शासकिय दवाखान्यात तपासणी व उपचारासाठी स्वतंत्र सुविधा ऊपलब्ध करून द्यावी.

नगर परिषदेचा 5% निधी दोन भागात वाटप करावा.

दिव्यांगच्या हक्काचा 5% निधी आता 10%पर्यंत खर्च करावा.
उपरोक्त मागण्या या दिव्यांगाच्या जीवनमान उंचावण्यासाठी गरजेच्या व आवश्यक असल्यामुळे दिव्यांगाचे होणारे हाल तद्वतच सदरहु नगर परिषद कडुन मिळणारी अपमानास्पद वागणुक थांबली पाहिजे असे मत महेश हजारे यांनी या वेळी बोलताना व्यक्त केले.
आंदोलन दरम्यान शहर प्रमुख इसरार अहेमद सिद्दिकी , उप शहर प्रमुख दादामिया शेख , कोरपना तालुका प्रमुख अफ्रोज अली ,सदानंद चांदेकर, जेष्ठ नेते पुंडलिक गोठे, इरशाद खान यांच्यासह अनेक दिव्यांग बांधव व महिला उपस्थित होत्या.
काँग्रेसचे राजु रेड्डी व आपचे अमित बोरकर यांनी आज या आंदोलनास आपले समर्थन दिले असल्याचे हजारे यांनी सांगितले.दुपारी
2:30 वाजताच्या दरम्यान घुग्घुस नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा चंद्रपूरचे नायब तहसिलदार जितेंद्र गादेवार यांनी या धरणे आंदोलनाची दखल घेत अनेक मागण्या तात्काळ मान्य केल्या.
रॅम्पचे काम दोन दिवसात करु, तसेच 5% निधी दोन भागात वाटप करू, हप्त्यात एक दिवस दिव्यांगाच्या समस्या सोडवण्याची व्यवस्था करू, पिण्याच्या पाण्याची सोय करू, दिव्यांगांना बसण्यासाठी सोय करू अशा महत्वांच्या मागण्या त्यांनी शिष्टमंडळासोबत बोलताना मान्य केल्या .आजचे आंदोलन हे यशस्वी ठरले अशी प्रतिक्रिया महेश हजारे यांनी दिली.