Home Breaking News • ब्रम्हपुरी तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपिट, शेत पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान ;...

• ब्रम्हपुरी तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपिट, शेत पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान ; पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी -कॉ.विनोद झोडगेंची मागणी!

80

• ब्रम्हपुरी तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपिट, शेत पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान ; पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी -कॉ.विनोद झोडगेंची मागणी!

ब्रम्हपुरी :किरण घाटे

ब्रम्हपुरी तालुक्याच्या विविध भागांत दि.19 मार्चला रात्री आलेल्या अवकाळी पावसामुळे व गारपिटीने शेत पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. शेत शिवारात अनेक झाडे कोलमडली असून या अस्मानी संकटामुळे शेतकरी पुन्हा आर्थिक संकटाच्या चक्रात अडकलेला आहे.
मंगळवारला सायंकाळ पासूनच ब्रम्हपुरी तालुक्यात विजांच्या कडकडाटासह वादळवारा सुरु झाला. रात्रीच्या सुमारास अवकाळी पावसासह गारपिट झाली. जवळपास अर्धा तास झालेल्या गारपिटीमुळे विविध भागांतील फळपीक, भाजीपाला,आणि रब्बी हंगामातील विविध पीकांचे अतोनात नुकसान झाले आहे.दरम्यान तालुक्यातील बोळधा, कुडेसावली, हळदा,मुडझा,खरकाडा, नीलज,रुई ,पाचगांव,गांगलवाडी, बरडकिन्ही, चिचगांव, आवळगांव, मेंडकी, वांद्रा परिसरात अवकाळी पावसासह आलेल्या गारपिटीचा अनेकांना फटका बसला आहे .तूर, भात,चना, गहू  रब्बी पीकांचे व कारली, टमाटर कांदा वांगा भेंडी,मिरची भाजीपाला आदिं पीकांचे फार मोठे नुकसान झाले आहे. गारांमुळे उभे असलेले पीक  जमीनदोस्त झाले असून भाजीपाला रब्बी पीके उद्वस्त झाली आहे. गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचा त्वरित सर्वे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याची मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ब्रम्हपुरी विधान सभा प्रमुख कॉ.विनोद झोडगे यांच्या नेतृत्वात बोळदा व कुडेसावली येथील शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी संदीप भस्के यांना एका लेखी निवेदनातुन केली आहे.या वेळी बोळदाच्या सरपंच मनीषा राजेंद्र झोडगे,राकेश ठाकरे,पत्रकार विजय रामटेके ,कैलाश वाडगुरे,अरुण वाडगुरे, विश्वनाथ कोसरे,विनोद वाडगुरे, रवींद्र हुलके,नामदेव कोटगले, गोकुळदास हुलके,बालाजी जुनघरे, रेवणाथ ठाकरे,आनंदराव राऊत,जीवन ठाकरे, कुडेसावली येथील माजी सरपंच वामन दडमल,दौलत ठाकरे,जनार्दन मानकर ,संजय ठाकरे ,चंद्र शेखर मेश्राम यांच्यासह अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते.