Home Breaking News ⬜🔶⬜विचाराचे झाड

⬜🔶⬜विचाराचे झाड

436

⬜🔶⬜विचाराचे झाड

बीज आशेचे
पेरता मनात,
सकारात्मकता
शिरली क्षणात.(१)

आनंदाचा वेल
जीवनी फुलला,
कण कण जणू
मोहरू लागला.(२)

विचाराने झाड
डवरले छान,
विवेकाचे पुष्प
पदरात दान.(३)

आत्मविश्वासाचा
ओसंडती झरा,
लाभला जीवनी
दृष्टिकोन खरा.(४)

🟪🟡🟫वैशाली राऊत सहज सुचलं सदस्य नागपूर⬜ संकलन -उज्वला निमगडे दुर्गापूर-चंद्रपूर