Home Breaking News Chandrapur @city news • अपघातात मृत्यू पावलेल्या मोहन राजुरकरांच्या कुटुंबीयांची आ....

Chandrapur @city news • अपघातात मृत्यू पावलेल्या मोहन राजुरकरांच्या कुटुंबीयांची आ. किशोर जोरगेवारांनी घेतली सांत्वनपर भेट

90

Chandrapur @city news

• अपघातात मृत्यू पावलेल्या मोहन राजुरकरांच्या कुटुंबीयांची आ. किशोर जोरगेवारांनी घेतली सांत्वनपर भेट

चंद्रपूर :किरण घाटे

चंद्रपूर : एका स्कुल बसच्या धडकेत उसगांव येथील मोहन राजुरकर या 26 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना दि.18 मार्चला उसगांव कॉर्नर जवळ घडली होती. सदरहु अपघातात दोघे जखमी झाले होते. दरम्यान आज आमदार किशोर जोरगेवार यांनी उसगांव येथील मृतक मोहनच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली . यावेळी या कुटुंबाला आर्थिक मदतही केली.
कामानिमित्त तीन मित्र दुचाकीने उसगांव वरून निघाले होते. दरम्यान उसगाव कॉर्नर जवळ एका खाजगी स्कुल बसने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात मोहन राजुरकर यांचा जागीच मृत्यु झाला तर दोन जण जखमी झाले आहे. यातील एकावर चंद्रपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. तर एकाला नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
शुक्रवारी आमदार जोरगेवार यांनी उसगांव येथील मृतक राजुरकर यांच्या कुटुंबींयाची भेट घेतली आहे. यावेळी मृतकाच्या वडिलांनी घडलेल्या घटनेबाबत माहिती दिली. अपघात झालेला मार्ग बंद होता मात्र एससीसी कंपनीने हा मार्ग सुरु केला. त्यामुळे हा अपघात झाला असल्याचा आरोप यावेळी कुटुंबीयांनी केला. आमदार जोरगेवार यांनी यावेळी घुग्घुस ठाणेदार यांना दुरध्वनी वरुन संपर्क साधत घडलेला प्रकार समजून घेतला. सदरहु प्रकरणाची योग्य चैकशी करण्याच्या सुचनाही यावेळी आमदार जोरगेवार यांनी केल्या आहे