Home Breaking News Chandrapur dist@ news •लोकसभा निवडणूक -चंद्रपूर-वणी-आर्णी क्षेत्र! •पटवारी विनोद खोब्रागडेही निवडणूक रिंगणात...

Chandrapur dist@ news •लोकसभा निवडणूक -चंद्रपूर-वणी-आर्णी क्षेत्र! •पटवारी विनोद खोब्रागडेही निवडणूक रिंगणात उतरणार !

306

Chandrapur dist@ news
•लोकसभा निवडणूक -चंद्रपूर-वणी-आर्णी क्षेत्र!
•पटवारी विनोद खोब्रागडेही निवडणूक रिंगणात उतरणार !

चंद्रपूर -किरण घाटे

चंद्रपूर जिल्ह्यातच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रात प्रकाश झोतात असणारे निर्भिड पटवारी विनोद खोब्रागडे हे चंद्रपूर -वणी -आर्णी या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवित असल्याचे त्यांनी काल दुपारी जाहीर केले आहे.मेरा काम मेरी पहचान है ! असं म्हणत त्यांनी यंदाची ही होवू घातलेली लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. अपक्ष उमेदवार म्हणून मी ही निवडणूक लढवित असल्याचे खुद्द खोब्रागडे यांनी या प्रतिनिधीशी बोलताना आज चंद्रपूर मुक्कामी सांगितले आहे.