Home Breaking News Varora taluka @news • वरोऱ्यात गुढीपाडवा उत्सवाचे आयोजन. •डॉ सुहास विनायक वझे...

Varora taluka @news • वरोऱ्यात गुढीपाडवा उत्सवाचे आयोजन. •डॉ सुहास विनायक वझे यांना वरोरारत्न जीवन गौरव पुरस्कार जाहीर.

44

Varora taluka @news
• वरोऱ्यात गुढीपाडवा उत्सवाचे आयोजन.
•डॉ सुहास विनायक वझे यांना वरोरारत्न जीवन गौरव पुरस्कार जाहीर.

✍️खेमचंद नेरकर
सुवर्ण भारत: तालुका प्रतिनीधी वरोरा

वरोरा: दिनांक 7 एप्रिल गांधी उद्यान योग मंडळ आणि गुढीपाडवा आयोजन समितीच्या वतीने मागील सात वर्षापासून हिंदू नववर्ष गुढीपाडव्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी मंगळवार दिनांक 9 एप्रिल ला या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे
मंगळवार ला सकाळी 7.30 वाजता वरोरा शहरातून रणरागिनींची बाईक रॅली काढण्यात येणार आहे. त्यानंतर लगेच ढोल ताशाच्या गजरात भव्य मिरवणूक शहरातील मुख्य चौकातून निघेल. यावेळी बैलबंडीवर पारंपरिक गुढी उभारली जाणार आहे.
सायंकाळी 7 वाजता परिमल जोशी व संच,नागपूर हे संगीत रजनी सादर करतील. यावेळी वरोरा रत्न जीवन गौरव पुरस्कार वरोऱ्याच्या माऊली प्रसिद्ध प्रसुतीतज्ञ डॉ सुहास विनायक वझे यांना प्रदान केला जाणार आहे. गांधी उद्यान योग मंडळाच्या वतीने स्वर्गरथ, ॲम्बुलन्स सेवा, ऑक्सीजन ब्रिगेड आदी सामाजिक उपक्रम राबविले जातात. यावर्षी स्व.डॉ विनायक वझे स्मृतिप्रित्यर्थ देण्यात येणाऱ्या आर्थो बँक चे लोकार्पण याप्रसंगी करण्यात येणार असून गांधीसागर तलावाच्या वाल्मिकी प्रवेशद्वारावर तीन दिवस रोषणाई केली जाणार असल्याचे गांधी उद्यान योग मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र नेमाडे आणि गुढी पाडवा आयोजन समितीचे अध्यक्ष नितेश जयस्वाल यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.