Korpna taluka@ news
• अपघातग्रस्तांसाठी ठरले भाजपा तालुका अध्यक्ष नारायण हिवरकर देवदूत
सुवर्ण भारत:मनोज गोरे
विशेष प्रतिनिधी, चंद्रपूर
कोरपणा :तालुक्यातील कोठोडा फाट्याजवळ एका टू व्हीलर चालकांनचां अपघातआज 26 एप्रिल दुपारी दोन वाजता दरम्यान शुक्रवारला घटना घडली त्यावेळेस रस्त्यावर पडलेल्या अवस्थेत अपघात ग्रस्त असल्याने अनेक नागरिक रस्त्याने यजा करत होते मात्र त्यांना कोणीही मदत करत नव्हते भाजपाचे तालुकाध्यक्ष नारायण हिवरकर यांचे याच रस्त्याने येत असताना त्यांना अपघात ग्रस्त रस्त्यावर दिसतात त्यांनी त्या दोघांनाही आपल्या स्वतःच्या कार मध्ये टाकून दवाखान्यात पोहोचविले त्यांच्या या मदतीने त्या दोन अपघातग्रस्तांची प्राण वाचले मात्र हे तेलंगणा राज्यातील नागरिक असावे असा अंदाज वर्तविला जात आहेत वृत्त लिहीपर्यंत त्या अपघातग्रस्त नागरिकांची ओळख पटली नव्हती भाजपा तालुका अध्यक्ष नारायण हिवरकर हे त्या अपघात ग्रस्तसाठी देवदूतच ठरले त्यांच्या या सामाजिक कार्याचे परिसरात कौतुक होत आहे.
