Home Breaking News Ghugus city @news • घुग्घूस येथील घटना दारू चे बिल देण्याच्या वादातून...

Ghugus city @news • घुग्घूस येथील घटना दारू चे बिल देण्याच्या वादातून मित्राने केले मित्राची हत्या

429

Ghugus city @news
• घुग्घूस येथील घटना दारू चे बिल देण्याच्या वादातून मित्राने केले मित्राची हत्या

सुवर्ण भारत: पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

येथील मालगुजारी तलावाजवळ असलेल्या देशी दारू भट्टी जवळ दारूचे पैसे देण्याच्या वादातुन एका मित्राने आपल्या मित्राला लाथाबुक्यानी मारहाण केली यात त्यांच्या मित्राची हत्या झाल्याची घटना आज दिनांक 11 मे ला सायंकाळी 7.15 ते 7.30 वाजता दरम्यान घडली.
यात मृतकाचे नावं मनोज जयस्वाल असून हत्या करणाऱ्याचे नावं सागर असल्याचे सांगितले जाते.

माहितीनुसार मनोज व सागर हे मित्र असून सागर हा एका कंपनीच्या पार्किंग मध्ये झोपतो व वॉर्ड क्रमांक 2 येथे असलेल्या शिवभोजन मध्ये भोजन करतो. आज शनिवार ला मालगुजारी तलावजवळ असलेल्या देशी दारू दुकानात मनोज व सागर यांनी सायंकाळी दारू प्राशन केली व दारूचे बिल देण्याच्या वादातून तु तु मै मै झाली यात सागर याने मनोज ला लाथाबुक्यानी मारहाण केली यामुळे तो गंभीर जखमी झाला त्याला उपचारासाठी दवाखान्यात भरती केले असता त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टनी सागितले. या घटनेची माहिती पोलिसांना होताच पोलीस घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा केला व मृतकाचे प्रेत शवविच्छेद करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे पाठविण्यात आले.

या घटनेचा पुढील तपास घुग्घूस पोलीस करीत आहे.