Home Breaking News Ghugus city@ news •घुग्घुस येथील कोल साइडिंगवर होणाऱ्या प्रदुषणार नियंत्रण करा ...

Ghugus city@ news •घुग्घुस येथील कोल साइडिंगवर होणाऱ्या प्रदुषणार नियंत्रण करा •कांग्रेस अनु.जाती.वि.कमेटी (ग्रामीण) तालुकाध्यक्ष राजकुमार वर्मा यांची पत्राद्वारे जिल्हाधिकारीला निवेदन

69

Ghugus city@ news
•घुग्घुस येथील कोल साइडिंगवर होणाऱ्या प्रदुषणार नियंत्रण करा

•कांग्रेस अनु.जाती.वि.कमेटी (ग्रामीण) तालुकाध्यक्ष राजकुमार वर्मा यांची पत्राद्वारे जिल्हाधिकारीला निवेदन

सुवर्ण भारत: पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनीधी चंद्रपूर

दि.२२ मे २०२४ बुधवार रोजी घुग्घुस येथील वेकोलि न्यू कोल रेल्वे साइडिंगमुळे होणारे प्रदूषण नागरिकांच्या आरोग्य आणि पर्यावरणासाठी अतिशय हानिकारक ठरत आहे. प्रदूषणामुळे आरोग्य विषयक समस्या, धूळ आणि धुरामुळे क्षेत्रात श्वसनाच्या आजार, ऍलर्जी आणि इतर आरोग्य समस्यांमध्ये वाढ होत आहे.

पर्यावरणीय परिणाम, आसपासच्या झाडांवर आणि जलस्रोतांवर परिणाम होत आहे.
जीवनाची गुणवत्ता घटणे, क्षेत्रात राहण्यायोग्य वातावरणाचा अभाव होत आहे. ज्यामुळे नागरिकांच्या जीवनाच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे.

घुग्घुस वेकोलि न्यू कोल रेल्वे साइडिंगमुळे होणारे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी उपाययोजना केल्या जाव्यात, कोल साइडिंग क्षेत्रात नियमितपणे पाण्याची फवारणी करून धूळ कमी करावी. कोल साइडिंगमध्ये अत्याधुनिक प्रदूषण नियंत्रण उपकरणे लावावीत. कोल साइडिंगच्या वाहतूक मार्गांची नियमित साफसफाई करावी. क्षेत्रातील रहिवाशांच्या आरोग्याची नियमित तपासणी करण्यासाठी आरोग्य शिबिरे आयोजित करावीत.

अशी मागणीचे निवेदन पत्राद्वारे चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमेटी (ग्रामीण) अनु. जाती विभाग तालुकाध्यक्ष राजकुमार वर्मा यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे.