Home Breaking News Chandrapur dist@ news •चंद्रपूरात पार पडला लोकहित सेवाचा- दहावी व बारावीच्या परीक्षेत...

Chandrapur dist@ news •चंद्रपूरात पार पडला लोकहित सेवाचा- दहावी व बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा कौतुक व अभिनंदन सोहळा! • कार्यक्रमाला अनेकांची उपस्थिती!

197

Chandrapur dist@ news
•चंद्रपूरात पार पडला लोकहित सेवाचा- दहावी व बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा कौतुक व अभिनंदन सोहळा!
• कार्यक्रमाला अनेकांची उपस्थिती!

सुवर्ण भारत:किरण घाटे ( उपसंपादक)

चंद्रपूर:दहावी व बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या चंद्रपूरातील रोहित संजय पारसे,कु.मिनल संतोष जामदाडे, कु.शर्वरी संजय पारसे, प्रतिक्षा प्रविण नौकरकर व सनत राजू रामटेके यांचा कौतुक व अभिनंदन सोहळा काल रविवार दि.२ जूनला दुपारी तुकुमस्थित प्रविण नौकरकर यांच्या निवासस्थानी अतिशय थाटात व उत्साहात पार पडला.या समारंभाचे आयोजन मूल निवासी राष्ट्रीय लोकहित सेवाचे चंद्रपूर जिल्हा कार्याध्यक्ष दत्तात्रय समर्थ व महिला सामाजिक कार्यकर्त्या अर्चना समर्थ यांच्या वतीने करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या आरंभी तैलिक महिला एल्गार संघटनेच्या चंदा इटनकर यांनी आपले प्रास्ताविक भाषण केले.तर याच संघटनेच्या संघटिका कल्पना गिरडकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांचा अल्प परिचय करून देत ह्या गुणवंत विद्यार्थ्यांनी या पुढेही शिक्षणात अशीच प्रगतीची पायरी गाठावी असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला. हा राष्ट्रीय लोकहित सेवाचा कौतुक व अभिनंदन सोहळा निश्चितच विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविणारा ठरला असून या पुढेही या संघटनेने अश्या कार्यक्रमांचे आयोजन करावे असे मत चंदा इटनकर व कविता कोंडावार यांनी या वेळी आपल्या भाषणातून बोलताना व्यक्त केले.आयोजित कार्यक्रमाला दत्तात्रय समर्थ,महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या मुख्य संयोजिका रंज्जू दिलीप मोडक, पडोलीचे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते पुंडलिक गोठे, भद्रावतीच्या व्हॅर्चुअस मल्टीपर्पज सोसायटीच्या संस्थापक -अध्यक्ष व महिला समाजसेविका कु.किरण साळवी, चंद्रपूर सहज सुचलं गृपच्या रिना तेलंग, भद्रावती तालुक्यातील शेगांव खूर्द येथील इंजिनिअर कु.प्रियंका गायकवाड,संजय पारसे,प्रविण नौकरकर,राजू रामटेके, शितल आदे , कुमुद खनके, सिंधूताई चौधरी,रेखा ताजणे,मंदा मांडवकर,माला नागपूरकर, ज्योति जामवाडे, अंजली इटनकर,पुनम नौकरकर, ललिता पारसे ,या शिवाय शहरातील अनेक मान्यवर मंडळींची उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली होती.लोकहित सेवाच्या वतीने पार पडलेल्या या कार्यक्रमाची उपस्थितीतांनी मुक्त कंठाने स्तुती केली.