Home Breaking News Chandrapur dist@ news • जलसंपदा विभागांतर्गत घेण्यात आलेल्या पदभरतीची अंतिम निवड यादी...

Chandrapur dist@ news • जलसंपदा विभागांतर्गत घेण्यात आलेल्या पदभरतीची अंतिम निवड यादी घोषित करा आ. किशोर जोरगेवारांची राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे मागणी!

62

Chandrapur dist@ news
• जलसंपदा विभागांतर्गत घेण्यात आलेल्या पदभरतीची अंतिम निवड यादी घोषित करा आ. किशोर जोरगेवारांची राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे मागणी!

सुवर्ण भारत: किरण घाटे(उपसंपादक)

चंद्रपूर:जलसंपदा विभागामार्फत घेण्यात आलेल्या परिक्षेचा निकाल 2 मार्च 2024 ला जाहीर करण्यात आला असला तरी अंतिम पदभरती निवड यादी घोषीत करण्यात आलेली नाही. त्यामुळे सदर अंतिम निवड यादी तात्काळ घोषित करण्यात यावी अशी मागणी चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे.
सोमवारी आमदार जोरगेवार यांनी मुंबई मंत्रालय येथील मुख्यमंत्री कार्यालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत चंद्रपूर मतदार संघातील विविध विकासकामांवर चर्चा केली. निवडणूकीच्या काळात मुख्यमंत्री यांनी महाराष्ट्रात प्रचाराची धुरा सांभाळली होती. नक्कीच याचा फायदा महायुतीला दिसून येणार असा विश्वास आमदार जोरगेवार यांनी व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन केले. सोबतच यावेळी त्यांनी जलसंपदा विभागामार्फत घेण्यात आलेल्या पदभरतीची निवड यादी घोषित करण्याची मागणी केली. सदरहु मागणीचे निवेदनही आमदार जोरगेवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे.
जलसंपदा विभागामार्फत डिसेंबर २०२३ मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. सर्व पदांच्या परीक्षा डिसेंबर २०२३ मध्येच घेण्यात आल्या व त्यानुसार ०२ मार्च २०२४ ला निकाल देखील जाहीर करण्यात आला. मात्र निकाल जाहीर होऊन आता ३ महिन्यांपेक्षा जास्त काळ लोटला तरीही विभागामार्फत तात्पुरती आणि अंतिम निवड यादी जाहीर करण्यात आली नाही. विभागामार्फत आचारसंहितेचे कारण देण्यात येत आहे. वास्तविक आचारसंहितेच्या काळात केवळ नियुक्ती देण्यास परवानगी नसते तरीही विभागाकडून या बाबतीत योग्य कारवाई होताना दिसत नाही.
याच काळात विविध जिल्हा परिषदानी निकाल जाहीर करून कागदपत्र पडताळणीसाठीची प्रक्रिया पूर्ण केल्याचे आढळून आले आहे. आधीच प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांची कमतरता असल्याने शासकीय कामकाजात दिरंगाई होत आहे. त्यातच जलसंपदा विभागातील निवड प्रक्रीयेंतर्गत अंतिम निवड यादी जाहीर करण्यात होत असलेली दिरंगाई योग्य नसल्याचे आमदार जोरगेवार यांनी निवेदनात म्हटले असून जलसंपदा विभागामार्फत घेण्यात आलेल्या पदभरती अंतर्गत विनाविलंब अंतिम निवड यादी घोषित करण्यासंदर्भात संबंधितांना तातडीने आदेशित करण्यात यावे अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.